adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

फैजपूर पोलिसांची अवैध गावठी दारू भट्ट्यांवर धडक कारवाई गावठी दारू विरोधात पोलिसांची मोहीम सुरूच राहणार

  फैजपूर पोलिसांची अवैध गावठी दारू भट्ट्यांवर धडक कारवाई  गावठी दारू विरोधात पोलिसांची मोहीम सुरूच राहणार  इदू पिंजारी फैजपूर  (संपादक -:- ह...

 फैजपूर पोलिसांची अवैध गावठी दारू भट्ट्यांवर धडक कारवाई 

गावठी दारू विरोधात पोलिसांची मोहीम सुरूच राहणार 


इदू पिंजारी फैजपूर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

फैजपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या गावठी हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या विरोधात पोलिसांनी सलग दोन दिवस धडक कारवाई करत कासवा आणि पाडळसा येथील दोन ठिकाणी छापे टाकले या कारवाईत मोठ्या प्रमाणावर कच्चे रसायन तयार गावठी दारू आणि हातभट्टीची साधने नष्ट करण्यात आली असून संबंधित दोन्ही विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. 

दि.१६ जुलै २०२६ रोजी सकाळी सुमारे ६.३० वाजता यावल तालुक्यातील मौजे कासवा येथील तापी नदी पात्रात अवध्य गावठी दारू तयार केली जात असल्याची माहिती फैजपूर पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी दशरथ दिलीप सपकाळे (रा. कासवा ता. यावल) यांच्या दारूभट्टीवर छापा टाकला या कारवाईत सुमारे ११ हजार ५०० रुपये किमतीचे ८०० लिटर गूळ मोह व नवसागर मिश्रित कच्चे व पक्के रसायन ७० लिटर तयार गावठी दारू तसेच हातभट्टीची विविध साधने जप्त करून नष्ट करण्यात आले याप्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल विकास सुरेश सोनवणे यांच्या फिर्यादीवरून फैजपूर पोलीस ठाण्यास गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

त्यानंतर दि.१७ जुलै २०२६ रोजी सकाळी सुमारे ६ वाजता यावल तालुक्यातील मौजे पाडळसा येथील राजा भोये नाल्यात पोलिसांनी दुसरी कारवाई केली येथे गणेश रवींद्र कोळी (रा. पाडळसा ता. यावल) यांच्या अवैध दारू भट्टीवर छापा टाकण्यात आला या कारवाईत सुमारे ५ हजार रुपये किमतीचे ४०० लिटर गूळ मोह व नवसागर मिश्रित कच्चे व पक्के रसायन ३५ लिटर तयार गावठी दारू तसेच हातभट्टीची साधने नष्ट करण्यात आली. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल मुकद्दर इब्राहिम तडवी यांच्या फिर्यादीवरून फैसूर पोलीस ठाण्यास गुन्हा क्रमांक १५१/२०२६ महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत दाखल करण्यात आला आहे. 

ही संपूर्ण कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील सहाय्यक फौजदार संतोष चौधरी सहाय्यक फौजदार मोती पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल विकास सोनवणे तसेच पोलीस कॉन्स्टेबल मुकद्दर तडवी यांनी यशस्वीपणे पार पाडली. फैजपुर पोलिसांनी अवध्य गावठी दारू निर्मिती व विक्री करणाऱ्या विरोधातील मोहीम यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे अशा कारवायांमुळे अवैध दारू व्यवसायाला बसण्यात मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

No comments