चोपडा अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात गुणवंतांचा सन्मान; विद्यार्थी व पालकांसाठी प्रेरणादायी गुणगौरव सोहळा संपन्न चोपडा प्रतिनिध...
चोपडा अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात गुणवंतांचा सन्मान; विद्यार्थी व पालकांसाठी प्रेरणादायी गुणगौरव सोहळा संपन्न
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित श्रीमती शरच्चंद्रिका सुरेश पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (इंजिनिअरिंग व पॉलिटेक्निक), चोपडा येथे महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई.उन्हाळी परीक्षा २०२६ तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे यांच्या हिवाळी परीक्षा २०२५ मधील गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा भव्य "गुणवंत विद्यार्थी व पालक गुणगौरव सोहळा" उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती माधुरी पाटील (मुख्याध्यापिका, प्रताप विद्यामंदिर, चोपडा),श्री. अंबर पाटील (मुख्याध्यापक, गोरगावले हायस्कूल),उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.व्ही.एन.बोरसे यांनी विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय यशाबद्दल अभिनंदन करून सातत्यपूर्ण अभ्यास, शिस्तबद्ध शिक्षण व गुणवत्तापूर्ण अध्यापनामुळे महाविद्यालयाचा निकाल गौरवास्पद ठरल्याचे सांगितले.यावेळी पॉलिटेक्निक व पदवी अभियांत्रिकी विभागातील प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षातील गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. पॉलिटेक्निक विभागात स्थापत्य विभागातून प्रथम वर्षात विराज नरेंद्र पाटील (८४.००%), द्वितीय वर्षात हार्दिक राजेश पाटील (८३.७८%) व तृतीय वर्षात शिवम सुनील कोळी (८४.९४%), संगणक विभागातून प्रथम वर्षात नयन योगेश पाटील (९३.६५%), द्वितीय वर्षात भैरवी अतुल चव्हाण (८६.७१%) व तृतीय वर्षात पूर्वा मनोज पाटील (९८.२४%), विद्युत विभागातून प्रथम वर्षात जान्हवी प्रदीप महाजन (९२.२४%), द्वितीय वर्षात राजेश किशोर पाटील (८७.०६%) व तृतीय वर्षात मयूर योगेश्वर सुतार (९८.११%), तर यांत्रिकी विभागातून प्रथम वर्षात युवराज संतोष महाजन (८1.६७ %), द्वितीय वर्षात वेदांत मनोजकुमार पाटील (८९.११%) व तृतीय वर्षात गुणवंत देवाजी सावळे (८५.९४%) यांनी प्रथम क्रमांक मिळवून महाविद्यालयाचा गौरव वाढविला. पदवी अभियांत्रिकी विभागात संगणक अभियांत्रिकीमध्ये भूमिका प्रदीप शिंदे (८.९३ CGPA), विद्युत अभियांत्रिकीमध्ये कांचन सुधाकर पाटील (७.७० CGPA), इलेक्ट्रॉनिक्स व दूरसंचार अभियांत्रिकीमध्ये खुशी दिलीप देशमुख (८.१३ CGPA) तसेच यंत्र अभियांत्रिकीमध्ये अभिजित शरद पाटील (७.४६ CGPA) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. यावेळी अभियांत्रिकी (B.Tech) सर्व शाखामधून प्रथम आलेली विद्यार्थिनी भूमिका प्रदीप शिंदे (८.९३ CGPA), तसेच पॉलिटेक्निक विभागात प्रथम आलेली विद्यार्थिनी पूर्वा मनोज पाटील (९८.२४%) यांचा विशेष सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष मा. भैय्यासाहेब अँड संदीप सुरेश पाटील तसेच संस्थेच्या सचिव मा.ताईसाहेब डॉ. स्मिता संदीप पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय यशाचा गौरव करून त्यांचे अभिनंदन केले तसेच भविष्यातही अशीच उज्ज्वल आणि यशस्वी कामगिरी करत राहण्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.पी.के.चौधरी यांनी केले.तसेच अभियांत्रिकी साठी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करिता डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,लोणेरे यांच्याकडून संलग्नता प्राप्त झाली आहे.

No comments