अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती महाराष्ट्र राज्य संघटनेच्या चोपडा तालुका अध्यक्षपदी अशोक कोळी यांची नियुक्ती चोपडा प्रतिनिधी (संपा...
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती महाराष्ट्र राज्य संघटनेच्या चोपडा तालुका अध्यक्षपदी अशोक कोळी यांची नियुक्ती
चोपडा प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती महाराष्ट्र राज्य या समिती मध्ये चोपडा तालुक्यातील घाडवेल जि.जळगाव येथील सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते अशोक कोळी यांची चोपडा तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती महाराष्ट्र राज्य, या संघटनेची बैठक दि.०८/०७/२०२६ रोजी संपन्न झाली यावेळी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष सौदागर महमदरफी यांच्या आदेशाने जळगाव जिल्हाध्यक्ष हेमकांत गायकवाड यांनी निवड करुण त्यांना तसे नियुक्तीपत्र दिले.
महाराष्ट्रात माहिती अधिकार,मानवीहक्क,पत्रकार संरक्षण,भ्रष्टाचार निर्मुलन,ग्राहक संरक्षण, कायद्याचा प्रचार,प्रसार करण्यात येणार आहे,त्याच प्रमाणे नागरिकांना व शासकीय घटकांना माहिती अधिकाराचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पत्रकार व माहिती अधीकार कार्यकर्त्यांवर होणारे खोटे गुन्हे व हल्ले या बाबत संघटितपणे लोकशाही व सनदशीर मार्गाने लढा दिला जाऊन कार्यकर्त्यांचे संगठन तयार करून भ्रष्ट नोकरशाही चा माहिती अधिकार कायद्याचा वापर करून पर्दाफाश करणार आहे. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतीक, वैद्यकिय क्षेत्रात, सरकारी कामात भ्रष्टाचार होत असल्यास त्या विरुध्द तक्रार देऊन उपोषण, अंदोलन करू अशी माहीती संस्थापक अध्यक्ष सौदागर महमद रफी यांनी दिली. या निवडी बद्दल यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे


No comments