संतोष आटोळे यांच्याकडे महाराष्ट्र धनगर समाज महासंघाच्या खामगाव शहराध्यक्षपदाची धुरा खामगाव पल्लवी पाटील (संपादक -:- हेमकांत गायकवाड) समाजह...
संतोष आटोळे यांच्याकडे महाराष्ट्र धनगर समाज महासंघाच्या खामगाव शहराध्यक्षपदाची धुरा
खामगाव पल्लवी पाटील
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
समाजहिताच्या विविध उपक्रमांमध्ये सातत्याने सक्रिय राहून उल्लेखनीय कार्य करणारे समाजसेवक संतोष बापूराव आटोळे यांची महाराष्ट्र धनगर समाज महासंघाच्या खामगाव शहराध्यक्ष (जि. बुलढाणा) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत महासंघाने ही महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली आहे.
महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष शरदभाऊ वसतकार यांच्या हस्ते दि. ९ जुलै २०२६ रोजी संतोष आटोळे यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी समाजबांधव, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार करण्यात आला.
नियुक्तीपत्रात नमूद केल्याप्रमाणे, संतोष आटोळे हे अनेक वर्षांपासून धनगर समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व संघटनात्मक कार्यात सक्रिय योगदान देत आहेत. समाजातील विविध प्रश्नांवर त्यांनी सातत्याने काम करत समाजबांधवांचा विश्वास संपादन केला आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि नेतृत्वगुणांचा लाभ समाज संघटनेला निश्चितच होईल, असा विश्वास महासंघाच्या प्रदेश नेतृत्वाने व्यक्त केला.
तसेच, संतोष आटोळे यांच्या नेतृत्वाखाली खामगाव शहरातील धनगर समाजाची संघटनात्मक बांधणी अधिक सक्षम होऊन समाजहिताच्या विविध योजना, उपक्रम आणि जनजागृती मोहिमा अधिक प्रभावीपणे राबविल्या जातील, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.
या नियुक्तीबद्दल संतोष आटोळे यांच्यावर समाजबांधवांसह विविध सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील सामाजिक व संघटनात्मक वाटचालीस सर्व स्तरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत. तसेच या नियुक्तीचे श्रेय महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष शरदभाऊ वसतकार यांच्या नेतृत्वाला दिले जात आहे.

No comments