adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

आजच्या काळात पत्रकारिता करणे खूप अवघड! सामाजिक कल्याणकारी कार्याचे चिंतन होणे गरजेचे :- श्रद्येय संत गोपाल चैतन्य महाराज

  आजच्या काळात पत्रकारिता करणे खूप अवघड! सामाजिक कल्याणकारी कार्याचे चिंतन होणे गरजेचे :- श्रद्येय संत गोपाल चैतन्य महाराज   रावेर प्रतिनिधी...

 आजच्या काळात पत्रकारिता करणे खूप अवघड!

सामाजिक कल्याणकारी कार्याचे चिंतन होणे गरजेचे :- श्रद्येय संत गोपाल चैतन्य महाराज  


रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 आजच्या काळात पत्रकारिता करणे खूप अवघड झाले असून काही ना काही व्यसन, राग, द्वेष, अहंकाराच्या कारणास्तव मनुष्याची अध्यात्मिक विचार सरणी बदलून वाद विवाद तसेच वैमनुष्याच्या आवेशात येऊन नको तसे कृत्य घडतांना दिसून येत आहेत आणि अश्या गोष्टींना सामोरे जाऊन मीडियाना आपले काम करतांना खूप अडचणीला सामोरे जावे लागत असून लोकांच्या मनातील असे विकार दूर करण्याकरिता पत्रकारितेच्या माध्यमातून संतांच्या सानिध्यात जे मानव कल्याण हितार्थ कार्य सुरु आहे त्या गोष्टी प्रकाशित करुन जीवन जगण्याची कला अवगत व्हावी या विचाराचा अवलंब जर केले तर नक्कीच अध्यात्मिक परिवर्तन घडून जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. तसाच प्रयास या सातपुड्याचा आदिवासी परिसरात परम पूज्य सदगुरु संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी यांनी अल्पवयात या वृंदावन धाम पाल आश्रमात ध्यान, तापचर्यें च्या माध्यमातून सिद्धी प्राप्त करुन केले. 


आणि ते ईश्वराच्या कृपेने सफल ठरले. पूज्य बापूजीनीं सामाजिक, शैक्षणिक तसेच अध्यात्मिक मार्गाचा अवलंब करुन अखिल भारतीय चैतन्य साधक परिवाच्या माध्यमातून व्यसनमुक्ती, सांधीपनी गुरुकुल, वृद्धाश्रम,भक्तीचा प्रचार प्रसार,अखंड हरीनाम संकीर्तन, युवा योग शिबीर, ध्यान केंद्र,आरोग्य,वृक्षारोपण, भाईचारा, भक्तीसभा,अश्या विविध कल्याणकारी कार्य करुन अखिल भारतीय चैतन्य साधक परिवारासह देशभरातील लाखो भाविकाच्या जीवनात परिवर्तन घडवून आणले आणि ते कार्य आजही पूज्य बापूजीच्या ब्राम्हलींनापच्यात ही निरंतर सुरळीत सुरु असल्याचे पाल आश्रमाचे विद्यमान पदस्थ व अखिल भारतीय संत समितीचे प्रदेश अध्यक्ष श्रद्येय संत श्री गोपाल चैतन्य जी महाराज यांनी दि. २६ जुलै रोजी पाल आश्रमातील पत्रकार परिषदेत संबोधन केले.यावेळी पाल सह जळगाव,रावेर,झिरन्या, खरगोन मध्यप्रदेश चे शेकडो पत्रकार उपस्थित होते. त्यानंतर मथुरा आश्रमाचे पदस्थ संत श्री हरिशरणानंद जी महाराज यांनी या संसारात हर एक व्यक्ती चा गुरू असतोच आणि येणाऱ्या गुरूपौर्णिमेला त्यांचे पूजन केल्याने गुरुकृपा प्राप्त होते. तसेच दि २९ जुलै रोजी या पाल वृंदावन धाम आश्रमात गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून देशभरातील किमान एक लाखाच्या वर भाविक उपस्थित राहून परम पूज्य सदगुरु संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजीच्या समाधी दर्शन व पादुका पूजन, तसेच श्रद्येय बाबाजीच्या अमृत वाणीचा लाभ धन्य होतात या पेक्षा परम सौभाग्य जीवनात दुसरा कुठलाच नाही. त्यानंतर जामनेर येथील चैतन्य धाम चे संत श्री श्याम चैतन्य जी महाराज यांनी ही पत्रकार परिषद घेण्याचा उद्येश असा आहे की जे गुरुदेव पूज्य बापूजीनीं महान कल्याणकारी कार्य केले आणि ते श्रद्येय बाबाजींच्या मार्गदर्शनातून निरंतर सुरु आहे अश्या कार्याचा प्रसार, प्रचार होणे गरजेचे असून यातून परिवर्तन घडणे शक्य आहे. आणि आपण जी सेवा पत्रकारितेचा माध्यमातून करीत आहोत त्याचाही सन्मान व्हावा हिच आमचा उद्येश होता. पत्रकार दिलीप वैद्य सर यांनी सामाजिक, धार्मिक काम करणे हॆ आपले कर्तव्य असून त्यातून समाजाची सुधारणा घडवून आणू शकतो. त्यानंतर मंगलम पवार यांनी जे चुकीचे विकार आहे याला संपवून अध्यात्मिक मार्गाचा वापर केला तरच जीवनमान उंचवू शकणार. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील राठोड सर यांनी केले तर शेवटी आभार छोटूलाल चव्हाण यांनी मानले.

No comments