मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा उत्साहात भरत कोळी यावल (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल : येथील मॉडर्न ...
मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा उत्साहात
भरत कोळी यावल
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल : येथील मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थाध्यक्षा सौ. नीता गजरे यांच्या हस्ते पालखी पूजन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी टाळ-मृदुंगाच्या गजरात "विठ्ठल... विठ्ठल..." असा अखंड नामघोष करत दिंडी काढली. विठ्ठल-रुक्मिणी, संत, वारकरी तसेच विविध पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या चिमुकल्यांनी उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अभंग गायन, भक्तिगीते आणि विठ्ठलाच्या जयघोषामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला. कार्यक्रमात संस्थाध्यक्षा सौ. नीता गजरे यांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे महत्त्व सांगत संतांची शिकवण आचरणात आणण्याचे आवाहन केले. शाळेतील शिक्षक-शिक्षिका, कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी शाळेचे व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

No comments