adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

शहरातील प्रसिद्ध हॉटेल्सचे परवाने निलंबित; अस्वच्छतेवर अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई

 शहरातील प्रसिद्ध हॉटेल्सचे परवाने निलंबित; अस्वच्छतेवर अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई  सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड...

 शहरातील प्रसिद्ध हॉटेल्सचे परवाने निलंबित; अस्वच्छतेवर अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

​अहिल्यानगर:- राज्यात अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचा पदभार स्वीकारताच डॅशिंग आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी आपला धडाका सुरू केला आहे.आता अहिल्यानगर  शहरात अन्न व औषध प्रशासनाने हॉटेल चालकांना मोठा दणका दिला असून, स्टेशन रस्त्यावरील राजकीय नेत्यांशी संबंधित असलेल्या प्रसिद्ध 'हॉटेल संगम' आणि 'हॉटेल सत्कार' या दोन मोठ्या हॉटेल्ससह शहरातील तब्बल ६ हॉटेलांचे परवाने पुढील आदेशापर्यंत निलंबित (रद्द) केले आहेत.या धडक कारवाईमुळे संपूर्ण जिल्ह्यातील हॉटेल चालकांचे धाबे दणाणले आहेत.​अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात हॉटेल,रेस्टॉरंट आणि अन्न आस्थापनांची कडक तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.या आदेशानुसार अहिल्यानगर येथील एफडीए (FDA) अधिकाऱ्यांच्या पथकाने शहरातील विविध नामांकित हॉटेल्सना अचानक भेटी देऊन झाडाझडती घेतली.​या तपासणी दरम्यान 'हॉटेल संगम', 'हॉटेल सत्कार' आणि इतर ४ हॉटेल्सच्या स्वयंपाकघरात (किचन) आणि परिसरात प्रचंड अस्वच्छता आढळून आली.अन्न सुरक्षा व मानके कायदे आणि नियमांचे (Regulations, 2011) सर्रास उल्लंघन होत असल्याचे आणि ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ केला जात असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. सार्वजनिक आरोग्य आणि जनहिताचा विचार करून प्रशासनाने तातडीने या हॉटेल्सचे परवाने निलंबित करण्याचा निर्णय घेतला.

​परवाना निलंबनाचा आदेश जारी झाल्यामुळे संबंधित हॉटेल चालकांना आता कोणत्याही प्रकारचा अन्न व्यवसाय किंवा विक्री करता येणार नाही.निलंबन काळात हॉटेल सुरू ठेवल्यास अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत थेट सील ठोकणे आणि फौजदारी गुन्हे दाखल करण्यासारखी कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल,असा सज्जड इशारा प्रशासनाने दिला आहे.​गेल्या काही दिवसांत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात १५० हून अधिक हॉटेल्सची तपासणी करत ३२ पेक्षा जास्त हॉटेल्सचे परवाने रद्द केले आहेत,तर अनेकांना नोटिसा बजावल्या आहेत. याच मोहिमेचा भाग म्हणून अहिल्यानगरात ही मोठी कारवाई करण्यात आली असून,पुढील काळात दूध भेसळ, बेकायदेशीर गुटखा आणि अस्वच्छ हॉटेल्सवर ही कारवाई अशीच सुरू राहणार असल्याचे संकेत अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

No comments