adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

माखरीया मैदान प्रभाग क्र. १५ मधील मूलभूत समस्यांवर लहुजी विद्रोही सेनेचे नगराध्यक्षांना निवेदन पिण्याचे पाणी, महादेव मंदिर, सभागृह, सीसीटीव्ही व वीज खांबासह विविध मागण्या; नगराध्यक्षा अपर्णा फुंडकर यांचे लवकर कार्यवाहीचे आश्वासन

माखरीया मैदान प्रभाग क्र. १५ मधील मूलभूत समस्यांवर लहुजी विद्रोही सेनेचे नगराध्यक्षांना निवेदन पिण्याचे पाणी, महादेव मंदिर, सभागृह, सीसीटीव्...

माखरीया मैदान प्रभाग क्र. १५ मधील मूलभूत समस्यांवर लहुजी विद्रोही सेनेचे नगराध्यक्षांना निवेदन

पिण्याचे पाणी, महादेव मंदिर, सभागृह, सीसीटीव्ही व वीज खांबासह विविध मागण्या; नगराध्यक्षा अपर्णा फुंडकर यांचे लवकर कार्यवाहीचे आश्वासन 


 पल्लवी पाटील खामगाव 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

खामगाव शहरातील प्रभाग क्र. १५ (माखरीया मैदान) परिसरातील नागरिकांना अनेक वर्षांपासून भेडसावत असलेल्या विविध मूलभूत समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी लहुजी विद्रोही सेनेच्या वतीने बुधवार, दि. ०१ जुलै २०२६ रोजी खामगाव नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. अपर्णा ताई फुंडकर यांना सविस्तर निवेदन देण्यात आले. हे निवेदन लहुजी विद्रोही सेना बुलढाणा जिल्हाध्यक्ष रुपेश हरीभाऊ अवचार यांच्या नेतृत्वाखाली माखरीया नगरातील नागरिकांच्या वतीने सादर करण्यात आले.

निवेदनात प्रभागातील नागरिकांना भेडसावणाऱ्या अनेक मूलभूत समस्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. परिसरातील अनेक भागांत आजही नळाद्वारे पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, तातडीने शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच महादेव मंदिराचे अपूर्ण बांधकाम तात्काळ पूर्ण करावे, छत्रपती शाहू महाराज शाळा क्र. १० च्या मागील बाजूस साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे सभागृह उभारण्यात यावे, परिसरातील प्रमुख ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत तसेच सागर अवसरमोल यांच्या घरासमोर आवश्यक विद्युत खांब (इलेक्ट्रिक पोल) उभारण्यात यावा, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.

निवेदनात, "प्रभागातील नागरिकांना आवश्यक नागरी सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात," अशी नम्र विनंती करण्यात आली असून, या समस्या दीर्घकाळ प्रलंबित असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

निवेदन स्वीकारताना नगराध्यक्षा सौ. अपर्णा ताई फुंडकर यांनी सर्व मागण्यांची गांभीर्याने दखल घेत संबंधित विभागामार्फत आवश्यक कार्यवाही करून प्रभाग क्र. १५ मधील समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्यात येतील, असे आश्वासन दिले.

सदर निवेदनाच्या प्रती मुख्याधिकारी, नगर परिषद खामगाव तसेच प्रभाग क्र. १५ (अ) व १५ (ब) चे नगरसेवक यांनाही देण्यात आल्या.

यावेळी लहुजी विद्रोही सेना बुलढाणा जिल्हाध्यक्ष रुपेश हरीभाऊ अवचार, रामा गायकवाड, सागर अवसरमोल, आकाश गायकवाड, राहुल अंभोरे तसेच माखरीया नगरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments