adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर महामार्ग या नाम फलकाचे नूतनीकरण करण्यासाठी भिमपुत्र ग्रुप तर्फे फैजपुर नगरपरिषदेला निवेदन.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर महामार्ग या नाम फलकाचे नूतनीकरण करण्यासाठी भिमपुत्र ग्रुप तर्फे फैजपुर नगरपरिषदेला निवेदन.  इदू पिंजारी फैजपुर...

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर महामार्ग या नाम फलकाचे नूतनीकरण करण्यासाठी भिमपुत्र ग्रुप तर्फे फैजपुर नगरपरिषदेला निवेदन. 


इदू पिंजारी फैजपुर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 फैजपुर नगरपरिषदे मार्फत फैजपुर शहरातून गेलेल्या बुऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गाला भारतीय संविधानाचे प्रमुख शिल्पकार,भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले आहे त्या आशयाचा फलक फैजपुर नगरपरिषदेने छत्री चौक या ठिकाणी लावला असून परंतु फलक हा वादळ वाऱ्या मुळे पूर्ण खाली वाकून गेलेला आहे व तसेच जीर्ण झाल्याने त्या फलका वरील महामानवाचे नाव पूर्ण पुसले गेल्याने त्यामुळे महामानवाचा अवमान होत असून त्या फलकाचे सोंदर्य पूर्ण धोक्यात आले असून फलकाची अवस्था ही पूर्ण बिकट झाली आहे त्या ठिकाणी फैजपुर नगरपरिषदे मार्फत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर महामार्ग असा नवीन एलईडी डिजिटल फलक लवकरात लवकर बसवून भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा होणारा अवमान थांबवावा अशी भिमपुत्र ग्रुप फैजपुर तर्फे फैजपुर नगरपरिषदेचे सहाय्यक मुख्याधिकारी श्री.हेमंत ठाकरे साहेब व बांधकाम अभियंता श्री.राकेश बहिरम साहेब यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे तसेच दिलेल्या निवेदनाची दखल लवकरात लवकर न घेतल्यास त्याच ठिकाणी भिमपुत्र ग्रुप व समस्त बौद्ध समाज, व सर्व भिम अनुयायी,तसेच भिम सैनिक,मोठ्या संख्येने रस्तावर उतरून रास्ता रोको व तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडतील व यामुळे शहराचा कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास याला सर्वस्वी जबाबदार फैजपुर न.पा.प्रशासन राहील याची नोंद प्रशासनाने घ्यावी.निवेदन देते वेळी भिमपुत्र ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष पप्पु मेढे, सागर भालेराव, राजु वाघ, अविनाश तायडे, गोल्डन मेढे, आर्यन केदारे, चंद्रमनी मेढे, उदय तायडे, रोहित मेढे, धनराज मेढे, बंडू मेढे, अनिल मेढे, गौरेश वानखेडे, चेतन तायडे, विशाल सुरवाडे, दिपक हिवरे, चेतन गाढे उपस्थित होते.

No comments