adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा पोलिसांची तत्परता; हरवलेल्या ६ वर्षीय चिमुकल्याचा अवघ्या दोन तासांत शोध पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाची जलद कारवाई; सुखरूप मुलगा कुटुंबीयांच्या स्वाधीन

चोपडा पोलिसांची तत्परता; हरवलेल्या ६ वर्षीय चिमुकल्याचा अवघ्या दोन तासांत शोध पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाची जलद का...

चोपडा पोलिसांची तत्परता; हरवलेल्या ६ वर्षीय चिमुकल्याचा अवघ्या दोन तासांत शोध

पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाची जलद कारवाई; सुखरूप मुलगा कुटुंबीयांच्या स्वाधीन 


चोपडा प्रतिनिधी

संपादक हेमकांत गायकवाड 

आज दिनांक १ जुलै २०२६ रोजी सकाळी सुमारे ११.०० वाजेच्या दरम्यान चोपडा शहरातील गणेश कॉलनी येथील रहिवासी शोभाबाई कैलास चौधरी यांनी त्यांचा नातू रुद्र संदीप चौधरी (वय ६ वर्षे) हा घराजवळून बेपत्ता झाल्याची माहिती चोपडा शहर पोलीस ठाण्यात दिली. या घटनेचे गांभीर्य ओळखून चोपडा शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी तात्काळ शोध पथके रवाना करून मुलाचा शोध घेण्याचे आदेश दिले.
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी करत तसेच विविध ठिकाणी शोधमोहीम राबवत अत्यंत शिताफीने तपास केला. त्यांच्या तत्पर आणि कौशल्यपूर्ण प्रयत्नांमुळे अवघ्या दोन तासांच्या आत हरवलेल्या रुद्रचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले.
सापडलेल्या मुलाला चोपडा शहर पोलीस ठाण्यात आणून त्याची विचारपूस करण्यात आली. त्याने स्वतःचे नाव रुद्र संदीप चौधरी (वय ६ वर्षे) असे सांगितल्यानंतर त्याची आजी शोभाबाई कैलास चौधरी यांना तातडीने पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले. आवश्यक खातरजमा केल्यानंतर मुलाला त्याच्या पालक, मामा व मामी यांच्या ताब्यात सुखरूप सुपूर्द करण्यात आले. यावेळी रुद्रने सांगितले की, खेळता-खेळता तो रस्ता चुकला होता आणि त्याला परत घरी जाण्याचा मार्ग सापडत नव्हता. हरवलेला चिमुकला सुखरूप परत मिळाल्याने कुटुंबीयांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. त्यांनी चोपडा शहर पोलिसांच्या तत्परतेचे आणि संवेदनशील कामगिरीचे मनापासून कौतुक करत सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले. ही घटना चोपडा शहर पोलिसांच्या सतर्कता, तत्परता आणि नागरिकांप्रती असलेल्या जबाबदारीची प्रचिती देणारी ठरली आहे.

No comments