सार्वजनिक विद्यालयात विद्यार्थी सुरक्षा समितीची बैठक संपन्न; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी विविध महत्त्वपूर्ण निर्णय अडावद, ता. चोपडा प्र...
सार्वजनिक विद्यालयात विद्यार्थी सुरक्षा समितीची बैठक संपन्न; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी विविध महत्त्वपूर्ण निर्णय
अडावद, ता. चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अडावद येथील सार्वजनिक विद्यालयामध्ये विद्यार्थी सुरक्षा समितीची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात संपन्न झाली. अडावद परिसर शिक्षण मंडळ संस्थेचे अध्यक्ष तथा विद्यार्थी सुरक्षा समितीचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी संबंधित विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीस अडावद केंद्राचे केंद्रप्रमुख आधार पानपाटील, मुख्याध्यापक अशोक कदम, पर्यवेक्षक मनोहर (एम. जी.) पाटील, मनोजकुमार देशमुख, उपशिक्षिका श्रीमती शुभांगी देशमुख तसेच समितीच्या सदस्य सौ. सुनिता पाटील, श्रीमती वैशाली शिंपी, श्री. नंदकिशोर धनगर, सौ. लक्ष्मी चंद्रकांत देशमुख आदी उपस्थित होते.
बैठकीत शाळेतील तसेच शाळेबाहेरील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. शाळेच्या परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करणे, सीसीटीव्ही यंत्रणेची नियमित देखभाल, मुख्य प्रवेशद्वारावरील सुरक्षा, विद्यार्थ्यांच्या येण्या-जाण्याच्या वेळेतील देखरेख, सुरक्षित वाहतूक व्यवस्था तसेच विद्यार्थ्यांचे समुपदेशन या विषयांवर विशेष भर देण्यात आला.
समितीने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी विविध ठराव मंजूर करून सुरक्षा व्यवस्था अधिक प्रभावी करण्याचा निर्णय घेतला. तसेच विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षा व जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेष कार्यशाळा आयोजित करण्याचाही निर्णय घेण्यात आला.
यावेळी मुख्याध्यापक अशोक कदम यांनी, "विद्यार्थ्यांची सुरक्षितता हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता असून शाळेत सुरक्षित, सकारात्मक आणि विश्वासार्ह वातावरण निर्माण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील," असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्रीमती शुभांगी देशमुख यांनी केले.
फोटो कॅप्शन :
अडावद (ता. चोपडा) येथील सार्वजनिक विद्यालयात आयोजित विद्यार्थी सुरक्षा समितीच्या बैठकीत अडावद केंद्राचे केंद्रप्रमुख आधार पानपाटील यांचा सत्कार करताना अध्यक्ष नंदकुमार देशमुख, मनोजकुमार देशमुख, मुख्याध्यापक अशोक कदम, एम. जी. पाटील, श्रीमती शुभांगी देशमुख तसेच अन्य मान्यवर.

No comments