निर्वाणा फाउंडेशनतर्फे NCMC स्मार्ट कार्डबाबत जनजागृती अभियान; नागरिकांना डिजिटल व्यवहारांचे मार्गदर्शन अंतुर्ली, ता. मुक्ताईनगर प्रतिनिध...
निर्वाणा फाउंडेशनतर्फे NCMC स्मार्ट कार्डबाबत जनजागृती अभियान; नागरिकांना डिजिटल व्यवहारांचे मार्गदर्शन
अंतुर्ली, ता. मुक्ताईनगर प्रतिनिधी : किरण धायले
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
निर्वाणा फाउंडेशनच्या वतीने नागरिकांमध्ये NCMC (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) विषयी जनजागृती करण्यासाठी विशेष अभियान राबविण्यात आले. या उपक्रमात नागरिकांना NCMC स्मार्ट कार्डचे महत्त्व, त्याचा विविध सेवांसाठी होणारा वापर, नोंदणी प्रक्रिया तसेच डिजिटल व्यवहारांचे फायदे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
या जनजागृती अभियानासाठी निर्वाणा फाउंडेशनचे अध्यक्ष ॲड. प्रफुल किशोर मेढे यांच्या मार्गदर्शनाखाली फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग घेत नागरिकांपर्यंत आवश्यक माहिती पोहोचविली. उपस्थित नागरिकांच्या विविध शंकांचे निरसन करून त्यांना NCMC कार्डचा प्रभावी वापर कसा करावा, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
समाजात डिजिटल साक्षरता वाढविणे, नागरिकांना आधुनिक डिजिटल सेवांशी जोडणे तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत डिजिटल व्यवहारांविषयी अधिक माहिती जाणून घेण्याची उत्सुकता व्यक्त केली. निर्वाणा फाउंडेशनच्या या जनजागृती अभियानाचे परिसरातील नागरिकांनी स्वागत करून उपक्रमाचे कौतुक केले.

No comments