मनवेल जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश भरत कोळी यावल (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मनवेल, ता. यावल : मनवेल येथ...
मनवेल जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश
भरत कोळी यावल
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मनवेल, ता. यावल : मनवेल येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात मान्यवरांसह शिक्षक व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
कार्यक्रमास साकळी केंद्राचे केंद्रप्रमुख मेहेबुब शेख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विविध देशी वृक्षांच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता पाटील तसेच उपशिक्षक दीपक चव्हाण उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना वृक्षांचे महत्त्व, पर्यावरण संरक्षण आणि वृक्षसंवर्धनाची आवश्यकता याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. "एक व्यक्ती – एक वृक्ष" हा संदेश देत प्रत्येकाने लावलेल्या वृक्षांचे संगोपन करण्याची शपथ घेतली. देशी वृक्षांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश देण्यात आला.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.

No comments