विश्व हिंदू परिषद व बजरंग दलातर्फे वृक्षारोपण; दर रविवारी मंदिर स्वच्छता मोहीम भरत कोळी यावल (संपादक -:- हेमकांत गायकवाड) शहरात विश्व हिंद...
विश्व हिंदू परिषद व बजरंग दलातर्फे वृक्षारोपण; दर रविवारी मंदिर स्वच्छता मोहीम
भरत कोळी यावल
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
शहरात विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने सेवा सप्ताहानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विविध ठिकाणी वृक्षांची लागवड करण्यात आली. कार्यकर्त्यांनी वृक्षांचे संगोपन करण्याचाही संकल्प केला.
यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व सांगून नागरिकांना अधिकाधिक वृक्षारोपण करण्याचे आवाहन केले. तसेच शहरातील धार्मिक स्थळे स्वच्छ व सुंदर राहावीत यासाठी दर रविवारी मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
या मोहिमेद्वारे मंदिर परिसरातील स्वच्छता, जनजागृती आणि सामाजिक सहभाग वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन स्वच्छता व पर्यावरण संवर्धनासाठी सहकार्य करावे, असे आवाहन विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने करण्यात आले.
या कार्यक्रमास आमदार अमोल दादा जावळे, बजरंग दल तालुका सह संयोजक हेमंत बडगुजर , दिंगबर बारी, गोपाल कोलते, गोपाल निंबाळकर , गोपाल बैरागी श्रीहरी वाणी, यश वाणी,विकास फेगडे सह सर्व कार्यकर्ते उपस्थित होते

No comments