धर्मवीर युथ फाउंडेशनच्या बुलडाणा जिल्हाप्रमुखपदी ओम टप यांची नियुक्ती अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मलकापूर : धर्म, रा...
धर्मवीर युथ फाउंडेशनच्या बुलडाणा जिल्हाप्रमुखपदी ओम टप यांची नियुक्ती
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मलकापूर : धर्म, राष्ट्र व हिंदू संस्कृतीच्या रक्षणासाठी कार्यरत असलेल्या धर्मवीर युथ फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मलकापूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते ओम अजय टप यांची जिल्हाप्रमुख (मलकापूर विधानसभा) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज संजय गायकवाड यांनी ही नियुक्ती जाहीर केली. ओम अजय टप यांनी सामाजिक, धार्मिक व जनहिताच्या विविध उपक्रमांमध्ये केलेल्या कार्याची दखल घेत त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.नियुक्तीनंतर ओम अजय टप यांनी संस्थेच्या विचारांना अनुसरून देव, देश आणि धर्मासाठी कार्य करत हिंदू समाजाचे संघटन, युवकांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना जागृत करणे तसेच सामाजिक उपक्रम अधिक जोमाने राबविण्याचा निर्धार व्यक्त केला.या नियुक्तीबद्दल विविध सामाजिक, राजकीय व धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

No comments