सुकी नदीला पूर.. दुथडी वाहते पाणी बघून शेतकरी आनंदीत! मोठा वाघोदा -चिनावल रस्त्याला नदीचे स्वरूप रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:- ...
सुकी नदीला पूर.. दुथडी वाहते पाणी बघून शेतकरी आनंदीत!
मोठा वाघोदा -चिनावल रस्त्याला नदीचे स्वरूप
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
सातपुडा पर्वताच्या रांगातून वाहत असलेली सुकी नदी गारबर्डी धरण व परिसरातील शेतकऱ्यांना निसर्गाने दिलेले वरदान..सलग दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे रावेर तालुक्यातील अनेक गावांमधील नदी नाले ओसंडून वाहत आहेत यासोबतच सातपुडा पर्वतात तसेच तालुक्यात मुसळधार पाऊस सुरूच आहे या संततधार पावसामुळे आज नावाने सुकी नदी दुथडी भरून वाहू लागल्याने शेतकरी वर्ग आनंदीत झाले असून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे
सुकी नदी वर असलेल्या अनेक पुलांवर पुराचे पाणी आल्याने लोहारा - कुसूंबा,कुंभारखेडा - उटखेडा -चिनावल उटखेडा पुलावरून वाहतूक विस्कळित झाली व हे मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते
मोठा वाघोदा ते चिनावल रस्त्याला नदीचे स्वरूप...
मोठा वाघोदा गावापासून चिनावल कडे जाणारा डांबरी रस्त्यावर शेतातील पावसाचे पाणी मुख्य रस्त्यावर आले व चक्क रस्त्याच्या दुतर्फा पाणी वाहू लागल्याने नदीचे स्वरूप या रस्त्याला आले वाहनधारकांना या रस्त्यावरुन मार्गक्रमण करतांना मोठी तारेवरची कसरत करावी लागली
मोठा वाघोदा येथील निंभोरा रस्त्यावरील लेंडी नाल्याला पुर येऊन पुराचे पाणी पुलावरून वाहत असल्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळित झाली होती तर लहान चारचाकी दुचाकी वाहनधारकांना ईतर पर्यायी मार्गाने मार्गक्रमण करावा लागला..
जुलै महिन्याच्या शेवटी रावेर तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावत शेतकरी राजा सह नागरिकांना मोठा दिलासा दिला.३० जुलै गुरुवारी पहाटेपासून सुरू झालेल्या पावसाने दिवसभर काही काही अंतराने जोर धरत समाधानकारक हजेरी लावली. यंदाच्या पावसाळ्यात सातत्याने झालेला हा पहिलाच जोरदार पाऊस ठरला.
पहाटे सुमारे ५ वाजता रिमझिम पावसाला सुरुवात झाली. सकाळी १० ते १२ दरम्यान पावसाचा जोर वाढला. दुपारी काही काळ उघडीप मिळाल्यानंतर सायंकाळी पुन्हा जोरदार सरी कोसळल्या. रात्रीपर्यत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरूच होता.
सततच्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, तापमानात सुमारे ४ ते ५ अंशांनी घट झाली. दिवसभर ढगाळ वातावरण राहिल्याने नागरिकांनी छत्री व रेनकोटचा आधार घेतला. पावसामुळे बाजार पेठेतील वर्दळही तुलनेने कमी झाली.


No comments