adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मलकापूर शहरासाठी रिंग रोड तातडीने मंजूर करा; अन्यथा जनआंदोलन छेडू – स्वाभिमानी शेतकरी संघटना मुख्यमंत्र्यांना उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत निवेदन; वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका आणि नागरिकांच्या गैरसोयींकडे वेध

मलकापूर शहरासाठी रिंग रोड तातडीने मंजूर करा; अन्यथा जनआंदोलन छेडू – स्वाभिमानी शेतकरी संघटना मुख्यमंत्र्यांना उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत निव...

मलकापूर शहरासाठी रिंग रोड तातडीने मंजूर करा; अन्यथा जनआंदोलन छेडू – स्वाभिमानी शेतकरी संघटना

मुख्यमंत्र्यांना उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत निवेदन; वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका आणि नागरिकांच्या गैरसोयींकडे वेध 


अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मलकापूर शहरासाठी बहुप्रतीक्षित रिंग रोड तातडीने मंजूर करून त्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात यावे, अशी ठाम मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष निलेश नारखेडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंगळवार (दि. १४ जुलै) रोजी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, मलकापूर शहरातील नागरिक गेल्या अनेक दशकांपासून रिंग रोडच्या प्रतीक्षेत आहेत. शहराची वाढती लोकसंख्या, वाहनांची दिवसेंदिवस वाढणारी संख्या आणि बुलढाणा रोडवरील वाढता वाहतुकीचा ताण यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.

शहरातील बाजारपेठेत दररोज हजारो नागरिकांची ये-जा असते. शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी, उपचारासाठी येणारे रुग्ण, रुग्णवाहिका, व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिकांना सतत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असून, त्यामुळे अपघातांचा धोका देखील वाढला आहे.

निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, राज्यातील अनेक शहरांमध्ये रिंग रोडची कामे पूर्ण झाली आहेत किंवा प्रगतीपथावर आहेत. मात्र मलकापूर-नांदुरा मतदारसंघ अद्यापही या महत्त्वाच्या पायाभूत सुविधेपासून वंचित आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींना रिंग रोडसारखा महत्त्वाचा प्रश्न सोडविण्यात अपयश आल्याची भावना नागरिकांमध्ये तीव्र झाली असून, विकासाच्या बाबतीत मतदारसंघ मागे पडल्याची खंतही व्यक्त होत आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शासनाला सवाल करताना, "इतर मतदारसंघांना रिंग रोड मिळू शकतो, तर मलकापूर-नांदुरा मतदारसंघातील नागरिकांवरच हा अन्याय का? सुरक्षित, सुकर आणि नियोजित वाहतुकीचा अधिकार येथील नागरिकांना नाही का?" असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

मलकापूर शहरासाठी रिंग रोड तातडीने मंजूर करून आवश्यक निधी उपलब्ध करावा आणि कामाला त्वरित सुरुवात करावी. अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल. त्या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी शासन व संबंधित प्रशासनाची राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

निवेदन सादर करताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष निलेश नारखेडे, तालुकाध्यक्ष गोपाल सातव, निंबाजी तायडे, शुभम नेमाने, सचिन बगाडे, मनोज वानेरे, सौरभ डिवरे आणि भगवान खूपसे उपस्थित होते.

No comments