स्व. रेन्शी राजेश सोनले यांच्या कार्याचा वारसा जपत १५ वी बुलढाणा जिल्हा कुडो स्पर्धा उत्साहात संपन्न खामगावात जिल्हाभरातील खेळाडूंचा उत्स्फू...
स्व. रेन्शी राजेश सोनले यांच्या कार्याचा वारसा जपत १५ वी बुलढाणा जिल्हा कुडो स्पर्धा उत्साहात संपन्न
खामगावात जिल्हाभरातील खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग; विजेते खेळाडू राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र
खामगाव | पल्लवी पाटील
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
कुडो असोसिएशन बुलढाणा व अंबिका क्रीडा मंडळ, खामगाव यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. रेन्शी राजेश सोनले यांच्या कार्याचा वारसा पुढे नेत १५ वी बुलढाणा जिल्हा कुडो स्पर्धा सोमवार (दि. १३ जुलै २०२६) रोजी राजमाता मा. जिजाऊ महिला व्यायाम शाळा, नगर परिषद सभागृह, खामगाव येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. बुलढाणा जिल्ह्यातील विविध कुडो प्रशिक्षण केंद्रांतील खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग नोंदवत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.
स्व. रेन्शी राजेश सोनले यांनी बुलढाणा जिल्ह्यात कुडो खेळाच्या प्रसारासाठी केलेले कार्य प्रेरणादायी असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले अनेक खेळाडू आज राज्य व राष्ट्रीय स्तरावर यश मिळवत आहेत. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली.
स्पर्धेच्या उद्घाटन व पारितोषिक वितरण समारंभाला महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आकाशदादा फुंडकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी खेळाडूंना शुभेच्छा देत कुडोसारख्या खेळातून शिस्त, आत्मविश्वास, धैर्य आणि उत्तम व्यक्तिमत्त्व विकसित होत असल्याचे सांगितले. तसेच खेळाडूंनी राज्य व राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करून बुलढाणा जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
स्पर्धेतील विजेते खेळाडू आता १७ वी महाराष्ट्र राज्य कुडो स्पर्धा – २०२६ तसेच ७ वा मुंबई महापौर चषक – २०२७ या स्पर्धांमध्ये दि. १६ व १७ ऑगस्ट रोजी मुंबई येथे बुलढाणा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
स्पर्धेचे आणखी एक प्रमुख आकर्षण म्हणजे ११ सायकलींचा लकी ड्रॉ ठरला. महेंद्रभाऊ रोहणकर, सुनीलभाऊ वानखेडे, नितीन सेठ डिडवानी, यशभाऊ आमले, गुलजमा शाह, मनोहरलालजी जांगिड, स्व. अजय ओंकारआप्पा तोडकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रसाद ओंकारआप्पा तोडकर, डॉ. कमलजी जांगिड, स्व. नकुल जाधव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ, एका गुप्त दात्याने तसेच स्व. रेन्शी राजेश सोनले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सोनले परिवाराने या उपक्रमाचे प्रायोजकत्व स्वीकारले.
लकी ड्रॉ विजेते :
१. उत्कर्ष योगेश भदाडे
२. प्रशिका जय मोरे
३. महिरा एजाजुद्दीन देशमुख
४. वाणी श्रीकांत सातव
५. मानसी माधव सोमवंशी
६. लावण्या प्रदीप तोंडे
७. विराट राजेश हेलोडे
८. अबू अमीर शाह
९. प्रज्ञेश आशिष चिंचोलकर
१०. क्रितार्थ सागर गाढे
११. मंदार डामरे
स्पर्धेसाठी राजमाता मा. जिजाऊ महिला व्यायाम शाळा, नगर परिषद सभागृह उपलब्ध करून दिल्याबद्दल खामगाव नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ. अपर्णाताई सागरदादा फुंडकर तसेच स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केल्याबद्दल मुख्याधिकारी प्रशांत शेळके यांचे कुडो असोसिएशन बुलढाणा व अंबिका क्रीडा मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी कुडो बुलढाणाचे चेअरमन महेंद्रभाऊ रोहणकर, अध्यक्ष सुनीलभाऊ वानखेडे, उपाध्यक्ष रवीजी जांगिड, सचिव यश राजेश सोनले, सहसचिव गणेशजी अलवाल आणि कोषाध्यक्ष दीपकभाऊ परळकर यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच सर्व पंच, प्रशिक्षक, पालक, स्वयंसेवक, प्रायोजक, अंबिका क्रीडा मंडळ, खामगावचे पदाधिकारी, सदस्य आणि उपस्थित मान्यवरांचे आयोजकांनी मनःपूर्वक आभार मानले.

No comments