adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

यावल–विरावली–दहिगाव–सावखेडा मार्गावरील धोकादायक झाडांच्या फांद्या, दिशादर्शक व वाहतूक सूचना फलक उभारणीची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदन सादर

  यावल–विरावली–दहिगाव–सावखेडा मार्गावरील धोकादायक झाडांच्या फांद्या, दिशादर्शक व वाहतूक सूचना फलक उभारणीची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे...

 यावल–विरावली–दहिगाव–सावखेडा मार्गावरील धोकादायक झाडांच्या फांद्या, दिशादर्शक व वाहतूक सूचना फलक उभारणीची मागणी

सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदन सादर 


भरत कोळी यावल

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 यावल–विरावली–दहिगाव–सावखेडा या सार्वजनिक मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात वाढलेल्या झाडांच्या फांद्यांमुळे वाहनचालक व प्रवाशांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, या मार्गावर आवश्यक दिशादर्शक  वेगमर्यादा  धोकादायक वळण  शाळा परिसर   तसेच इतर वाहतूक व सुरक्षा सूचना फलक तातडीने बसविण्यात यावेत, या मागणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज फाउंडेशनचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस चे युवा कार्यकर्ते विरावली गावाचे माजी ग्रामपंचायत सदस्य ॲड. देवकांत बाजीराव पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, यावल येथे सविस्तर निवेदन सादर केले.

हे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभाग, यावल येथील वरिष्ठ लिपिक श्री. विकास बी. जंजाळे यांनी स्वीकारले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, यावल–विरावली–दहिगाव–सावखेडा मार्ग हा अनेक गावांना जोडणारा महत्त्वाचा रस्ता असून या मार्गावर दररोज शालेय विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, कामगार तसेच हजारो नागरिक प्रवास करतात. मात्र रस्त्यालगतच्या झाडांच्या फांद्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे समोरून येणारी वाहने स्पष्टपणे दिसत नाहीत. विशेषतः बस, ट्रक व इतर मोठ्या वाहनांच्या प्रवाशांना झाडांच्या फांद्यांमुळे दुखापत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सध्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर झाडांच्या फांद्या अधिक झुकल्याने अपघाताचा धोका आणखी वाढला असून, कोणतीही जीवितहानी होण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

याशिवाय संपूर्ण मार्गावर दिशादर्शक फलक, वेगमर्यादा फलक, धोकादायक वळणाची सूचना, शाळा परिसराची सूचना, गाव हद्द दर्शविणारे फलक, परावर्तित  सूचना फलक तसेच इतर आवश्यक रस्ता सुरक्षा चिन्हांचा अभाव असल्याने वाहनचालकांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले आहे.

निवेदनातील प्रमुख मागण्या :

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाढलेल्या झाडांच्या फांद्यांची तातडीने छाटणी करावी.

आवश्यक त्या ठिकाणी दिशादर्शक  फलक बसवावेत.

वेगमर्यादा  फलक उभारावेत.

धोकादायक वळण  सूचना फलक बसवावेत.

शाळा परिसर सूचना फलक बसवावेत.

गाव हद्द व इतर आवश्यक वाहतूक व सुरक्षा सूचना फलक उभारावेत.

अपघातप्रवण ठिकाणी परावर्तित  सूचना फलक व रस्ता सुरक्षा चिन्हे बसवावीत.

याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ कार्यवाही करून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ॲड. देवकांत बाजीराव पाटील यांनी केली आहे. या मागणीमुळे परिसरातील नागरिक, वाहनचालक आणि प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त होत असून प्रशासनाने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

No comments