adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

विठ्ठल नामाच्या गजरात हातेड ते प्रति पंढरपूर (बाळद) पायी दिंडी सोहळा उत्साहात संपन्न

  विठ्ठल नामाच्या गजरात हातेड ते प्रति पंढरपूर (बाळद) पायी दिंडी सोहळा उत्साहात संपन्न     चोपडा, प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) हात...

  विठ्ठल नामाच्या गजरात हातेड ते प्रति पंढरपूर (बाळद) पायी दिंडी सोहळा उत्साहात संपन्न  


  चोपडा, प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

हातेड बु. (ता. चोपडा) : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त हातेड बु. येथून श्रीक्षेत्र प्रति पंढरपूर, बाळद येथे आयोजित करण्यात आलेला सद्गुरू शंकरबाबा पायी दिंडी पालखी सोहळा मोठ्या भक्तिभावात, उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाला. ह.भ.प. दिंडी चालक अनिल दिनकर सोनवणे यांच्या पुढाकाराने आयोजित या दिंडी सोहळ्यात गावातील महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक तसेच तरुणांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

दिंडी मार्गावर "ज्ञानोबा-तुकाराम", "पुंडलिक वरदा हरी विठ्ठल" आणि विठ्ठल नामाच्या अखंड गजराने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. टाळ-मृदंगाच्या निनादात, हरिनामाच्या जयघोषात आणि भजन-कीर्तनाच्या सुरेल वातावरणात भाविकांनी पायी वारीचा आनंद लुटला. श्रीक्षेत्र प्रति पंढरपूर, बाळद येथे श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेऊन भाविकांनी समाधान व्यक्त केले.

या दिंडी सोहळ्याच्या यशस्वी आयोजनात गावातील ग्रामस्थ, तरुण वर्ग तसेच श्रीराम भजनी मंडळ, हातेड बु. यांचे मोलाचे सहकार्य लाभले. भाविकांची सोय, दिंडीचे नियोजन, शिस्त आणि सुरक्षिततेची योग्य व्यवस्था करण्यात आल्याने संपूर्ण सोहळा निर्विघ्न व आनंददायी वातावरणात पार पडला.

यशस्वी आयोजनासाठी योगदान देणारे ह.भ.प. दिंडी चालक अनिल दिनकर सोनवणे, श्रीराम भजनी मंडळ, हातेड बु., सर्व ग्रामस्थ, महिला मंडळ, तरुण वर्ग आणि सहकार्य करणाऱ्या सर्व भक्तांचे आयोजकांच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने पार पडलेल्या या भक्तिमय दिंडी सोहळ्यामुळे हातेड बु. परिसरात अध्यात्म, भक्ती आणि सामाजिक ऐक्याचा सुंदर संदेश देणारे वातावरण निर्माण झाले.

No comments