स्वर्गीय अजितदादांच्या जयंतीनिमित्त तापी शेतकरी सहकारी सूतगिरणीत भावपूर्ण अभिवादन चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा शहरात...
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा शहरातील तापी शेतकरी सहकारी सूतगिरणीच्या कार्यालयात बुधवार, दि. २२ जुलै रोजी सकाळी १०.१० वाजता स्वर्गीय अजितदादांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तापी शेतकरी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन तथा माजी आमदार कैलास बापू पाटील उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्वर्गीय अजितदादांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करत त्यांच्या सहकार, सामाजिक आणि जनहिताच्या कार्याला उजाळा दिला. त्यांच्या विचारांचा आदर्श समाजाने पुढे नेण्याची गरज असल्याचे मतही व्यक्त करण्यात आले.
यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माजी व्हाईस चेअरमन सौ. इंदिराताई पाटील, मार्केट कमिटीचे संचालक नंदकिशोर पाटील, शेतकी संघाचे संचालक प्रल्हाद पाटील, सूतगिरणीचे संचालक वजहत अली काझी, कैलास बाविस्कर, रमाकांत (बोरसे सर) पाटील, कवी रमेश जे. पाटील, सुनील पाटील, योगेश धनगर, आनंद मोरे यांच्यासह सूतगिरणीचे पदाधिकारी, संचालक मंडळाचे सदस्य, कर्मचारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सांगता स्वर्गीय अजितदादांच्या स्मृतींना सामूहिक आदरांजली अर्पण करून करण्यात आली.

No comments