adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

आपली एक छोटीशी चूक संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकते - पोलीस निरीक्षक संदीप पाटील कमलबाई अग्रवाल विद्यालयाच्या विद्यार्थीनींशी संवाद!

 आपली एक छोटीशी चूक संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकते - पोलीस निरीक्षक संदीप पाटील   कमलबाई अग्रवाल विद्यालयाच्या विद्यार्थीनींशी संवाद!  रा...

 आपली एक छोटीशी चूक संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकते - पोलीस निरीक्षक संदीप पाटील 

 कमलबाई अग्रवाल विद्यालयाच्या विद्यार्थीनींशी संवाद! 


रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

रावेर येथील शिक्षण संवर्धक संघ द्वारा संचलित सौ कमलाबाई एस अग्रवाल महिला विद्यालय या ठिकाणी रावेर पोलीस स्टेशनच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला यात पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी उपस्थित विद्यार्थिनींशी संवाद साधला यावेळी त्यांनी आपले भवितव्य घडवितांना आई वडिलांच्या परिश्रमाची जाणीव ठेवा दुर्लक्ष केले पश्चाताप होईल. समाज मनात वावरणाऱ्या लहान पासून ते वृद्ध महिलांपर्यंत अनेक समाज विघातक व अत्याचाराच्या घटना घडत आहेत तसेच ऑनलाईन आर्थिक फसवणूकीचे प्रमाणात वाढ झाली असून  विविध प्रकारच्या गुन्ह्यांची ओळख व्हावी व जनजागृती च्या उद्देशाने रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी उपस्थित विद्यार्थिनींची संवाद कार्यक्रमातून मार्गदर्शन केले. पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की आपली एखादी छोटीशी चूक तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकते तसेच सावधगिरी म्हणून आर्थिक व्यवहार करणाऱ्या संस्थांद्वारा KYC करण्यात येते अनेक वेळा सायबर गुन्हेगार यात आपली फसवणूक करतात. होणारी फसवणूक यात ATM CVv नंबर OTP मागणे पिन मागून होणारी ऑनलाईन आर्थिक फसवणूक नवीन कायदे, सायबर गुन्हेगारी, या प्रकारची गुन्हेगारी आपण ओळखणे आवश्यक असून या विषयावर श्री पाटील यांनी विद्यार्थिनींना सखोल मार्गदर्शन केले तर कौटुंबिक अत्याचार अनधिकृत अँपचा वापर, ए आय वापरचा अतिरेक यासंह युवती व युवक अल्पवयीन विवाह करतात परिवाराची काळजी न करता 


प्रेमात आंधळे होऊन आपलं आयुष्य उध्वस्त करतात. युवक युवतींनी आपले भवितव्य घडवितांना आपल्या आई वडिलांचा चेहरा आणी त्यांचे परिश्रम आठवावेत त्याकडे दुर्लक्ष झाल्यावर पश्चाताप होतो तेव्हा वेळ निघून गेलेली असते. आपल्या समोरील आवाहने ओळखून काळाची गरज तसेच होणारे विविध गुन्हेगारी जगतातील धोके ओळखून वाटचाल करावी मनाविरुद्ध होत असलेल्या घटनांची जवळच्या नातेवाईकांची अथवा पोलिसांशी संवाद साधून मार्गदर्शन घेत राहावे यामुळे आपली होणारी फसवणूक नक्कीच थांबू शकते असेही आवाहन संदीप पाटील यांनी केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका प्रतिभा कुलकर्णी या होत्या तर प्रमुख उपस्थित उप मुख्याध्यापक रमण तायडे एम एच पाचपोहे एस एच कोल्हे सुरेश विचवे मोहन महाजन एम एम गडे सुनील महाजन मनीषा पवार श्री राठोड के एम पाटील सुनीता पाटील दीपक नगरे चंद्रकांत विचवे हिरालाल गुमडकर हे होते सुत्र संचालन  पंकज पाटील यांनी केले तरी आभार एस एन पाटील यांनी मानले

No comments