अहिल्यानगरमध्ये खळबळ! एकाच चोराकडून तब्बल ५ गाड्यांची जबरी चोरी..एलसीबीच्या जाळ्यात अलगद अडकला सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकां...
अहिल्यानगरमध्ये खळबळ! एकाच चोराकडून तब्बल ५ गाड्यांची जबरी चोरी..एलसीबीच्या जाळ्यात अलगद अडकला
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर :- शहर आणि परिसरातून दुचाकी वाहने गायब करणाऱ्या एका अट्टल चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) ला यश आले आहे.अहिल्यानगर शहरातून या भामट्याला रंगेहात ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून तब्बल ५ चोरीच्या मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत. किशोर जयसिंग पठारे (वय ४५,रा.पिंपळगाव माळवी,ता. जि.अहिल्यानगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.घटनेची सविस्तर हकीगत अशी की,ता.१७ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.३० ते दुपारी ०१.०० वाजेच्या सुमारास वेणुगंगा कन्सलटन्सी सर्व्हिसेस,एकविरा चौक, पाईपलाईन रोड,साईकृपा बिल्डिंग (अहिल्यानगर) येथे फिर्यादी शशिकांत भाऊसाहेब गलबले यांनी त्यांची एच.एफ. डिलक्स मोटार सायकल (MH 16 CH 7552) हँडल लॉक करून पार्क केली होती. काही वेळातच अज्ञात चोरट्याने ती गाडी चोरून नेली.याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२) नुसार गुन्हा (गु.र.नं. ६१३/२०२६) दाखल करण्यात आला होता.वाहन चोरीचे वाढते प्रमाण लक्षात घेता पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली एलसीबीचे विशेष पथक तैनात करण्यात आले.पोलीस अंमलदार अरविंद भिंगारदिवे, योगेश भिंगारदिवे,फुरकान शेख,दीपक घाटकर,भिमराज खर्से,प्रमोद जाधव आणि प्रशांत राठोड यांनी घटनास्थळी भेट देऊन तांत्रिक विश्लेषण सुरू केले.दरम्यान,२६ जुलै २०२६ रोजी गुप्त बातमीदाराकडून पक्की माहिती मिळाली की, संशयित आरोपी किशोर पठारे हा चोरीच्या एम.एच.१६ सी.एच.७५५२ क्रमांकाच्या मोटार सायकलवरून रामवाडीकडून तारकपूर बस स्टँडच्या दिशेने येत आहे. माहिती मिळताच पथकाने रामवाडी रस्त्यावर सापळा रचला.संशयित गाडी येताच पोलिसांनी त्याला चौफेर घेरून ताब्यात घेतले.पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.त्याच्या ताब्यातून एकूण १,५५,००० रुपये किंमतीच्या ५ मोटार सायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत.आरोपीला पुढील तपासासाठी तोफखाना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक श्री.मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.

No comments