adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

ग्राहकांना अवाजवी देण्यात आलेली विज-बिले कमी करण्यासाठी भूमिपुत्रांची महावितरण कार्यालयावर धडक....! चुकीच्या पद्धतीने विजबिले दिल्यामुळे ग्राहकांमध्ये प्रचंड मोठा संताप :- अक्षय पाटील

 ग्राहकांना अवाजवी देण्यात आलेली विज-बिले कमी करण्यासाठी भूमिपुत्रांची महावितरण कार्यालयावर धडक....! चुकीच्या पद्धतीने विजबिले दिल्यामुळे ग्...

 ग्राहकांना अवाजवी देण्यात आलेली विज-बिले कमी करण्यासाठी भूमिपुत्रांची महावितरण कार्यालयावर धडक....!

चुकीच्या पद्धतीने विजबिले दिल्यामुळे ग्राहकांमध्ये प्रचंड मोठा संताप :- अक्षय पाटील  


जळगाव (जा.) प्रतिनिधी

संपादक हेमकांत गायकवाड 

जळगाव (जा.):-  तालुक्यामध्ये अनेक ग्राहकांना महावितरण कडून अव्वाच्या-सव्वा विज बिले देण्यात आली असल्याने अनेक ग्राहक महावितरण कार्यालयमध्ये विज बिल कमी करण्यासाठी वारंवार चकरा मारत आहे परंतु महावितरण कार्यालयातील काही अधिकारी प्रत्येक वेळेस चुकीचे कारणे दाखवून वेळ मारून देतात त्यामुळे ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागला.

लाईन चा वापर कमी असून सुद्धा स्मार्ट मीटर तसेच वाढीव इतर सेवा शुल्क ग्राहकांना विचारात न घेता लादण्यात आल्यामुळे वापरापेक्षाही अतीजास्त बिल ग्राहकांना देण्यात येत आहे.

वास्तविक स्मार्ट मीटर बदली करताना किंवा बसवताना ग्राहकांची पूर्वसंमती कंपनीकडून घेण्यात आली नाही.तसेच जुन्या मीटरचा वापर कमी असून सुद्धा अतिरिक्त शुल्क आकारणीमुळे ग्राहकांवर मोठा आर्थिक लोड वाढत असल्याने ही बाब ग्राहकांवर अन्याय करणारी आहे.

त्यामुळे ज्या ग्राहकांना वीज वितरण कंपनीकडून मोठ्याप्रमाणात बिले देण्यात आली आहे त्यांची बिले कमी करावी यासाठी अनेक वाढीव विज बिल घेऊन दिनांक 27/7/2026 रोजी युवा आंदोलक अक्षय पाटील यांनी महावितरण कार्यालयावर धकड दिली. व उपकार्यकारी अभियंता चौबारावाला साहेब यांच्याशी मुद्देसूद चर्चा केली तसेच वाढीव आलेली बिले कमी करण्यासाठी आक्रमक पवित्र घेतला यावेळी मोठ्या संख्येने ग्राहक उपस्थित होते.

यावेळी अनिलसिंह राजपूत, शिवदास खिरोडकार,वैभव जाणे,अजय गिरी,आकाश आटोळे,जितेंद्र चाहेल,अमोल बहादरे, संतोष गंणगे, सागर गवई, सोपान भालतडक, सय्यद भाऊ तसेच मोठ्या संख्येने ग्राहक उपस्थित होते.

No comments