दोन पुरस्कारांनी सन्मानित डी बी पाटील यांचा दोडे गुजर संस्थान तर्फे सत्कार. चंद्रकांत पाटील विचखेडा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा:- ...
दोन पुरस्कारांनी सन्मानित डी बी पाटील यांचा दोडे गुजर संस्थान तर्फे सत्कार.
चंद्रकांत पाटील विचखेडा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा:- तालुक्यातील गरताड येथील सत खेडेकर परिवारातील हल्ली मुक्काम चोपडा शहर पंकज नगर या भागातील रहिवासी व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सेवानिवृत्त उपव्यवस्थापक डी. बी. पाटील यांचा दोडे गुजर संस्थांतर्फे गौरव करण्यात आला. डी बी पाटील यांना गेल्या सहा महिन्यापूर्वी दोन पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते या पार्श्वभूमीवर गुजर संस्थांचे अध्यक्ष चंद्रशेखर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक तथा कृषी उत्पन्न बाजार समिती जळगाव चे सभापती लकी टेलर उर्फ लक्ष्मण गंगाराम पाटील यांनी त्यांना शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन गौरविले. यावेळी संस्थानाचे कार्यकारी मंडळातील सचिव राधेश्याम चौधरी, निश्चल पाटील, एल .डी .पाटील, उल्हासराव जाधव ,मनोज पाटील, मुरलीधर पाटील, डॉक्टर चंद्रशेखर पाटील शशिकांत पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते. जळगाव येथे हा कार्यक्रम उत्साहात व आनंदात पार पडला.

No comments