adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

आदिवासी नेते चेतरजी वसावा प्रकरणी SIT चौकशीची भिल समाज विकास मंच ची मागणी

  आदिवासी नेते चेतरजी वसावा प्रकरणी SIT चौकशीची भिल समाज विकास मंच ची मागणी  विकास पाटील धरणगाव (संपादक -:- हेमकांत गायकवाड) एरंडोल (जि. जळग...

 आदिवासी नेते चेतरजी वसावा प्रकरणी SIT चौकशीची भिल समाज विकास मंच ची मागणी 


विकास पाटील धरणगाव

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

एरंडोल (जि. जळगाव) : गुजरात राज्यातील डेडियापाडा मतदारसंघाचे आमदार तथा आदिवासी नेते चेतरजी वसावा यांच्याविरोधातील प्रकरणात निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी ‘भिल समाज विकास मंच, महाराष्ट्र राज्य’ यांच्याकडून करण्यात आली आहे. दि. 25 जून 2026 रोजी सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या व्हिडिओ व बातम्यांच्या आधारे, संबंधित प्रकरणात राजकीय दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणात संबंधित अधिकारी व जबाबदार व्यक्तींवर कारवाई करून संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) नेमण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की,चेतरजी वसावा यांना न्यायालयीन प्रक्रियेत अडचणी येत असून, त्यांच्या कुटुंबीयांनाही त्रास सहन करावा लागत आहे. 

या पार्श्वभूमीवर त्यांना न्याय मिळावा व त्यांची सुटका करण्यात यावी,अशी मागणी करण्यात आली आहे. सदर निवेदन जिल्हाधिकारी, जळगाव यांना उपविभागीय अधिकारी, एरंडोल यांच्या मार्फत सादर करण्यात आले असून,देशातील विविध उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनाही त्याची प्रत पाठवण्यात आली आहे. या वेळी उपस्थित महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख तथा जळगाव जिल्हाध्यक्ष दिपक अहिरे, सोशल मीडिया जिल्हाप्रमुख सागर वाघ, एरंडोल तालुकाध्यक्ष भैय्या मोरे, युवा तालुकाध्यक्ष निहाल सोनवणे, लक्ष्मण जावळे, पंढरीनाथ मोरे, सखाराम मोरे, वासुदेव गायकवाड, राजधर सोनवणे,करण सोनवणे, मोतीराम जावळे, हिरालाल सोनवणे, बादल ठाकरे, करण बेलदार,आकाश ठाकरे, अजय बेलदार, कुणाल अहिरे, दिपक सुर्यवंशी,

No comments