adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपड्यात रोटरी वर्षाचा वृक्षारोपण व सन्मान सोहळ्याने उत्साहात आरंभ

  चोपड्यात रोटरी वर्षाचा वृक्षारोपण व सन्मान सोहळ्याने उत्साहात आरंभ  चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा - कृषी दिवस, डॉक्टर...

 चोपड्यात रोटरी वर्षाचा वृक्षारोपण व सन्मान सोहळ्याने उत्साहात आरंभ 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा - कृषी दिवस, डॉक्टर्स डे आणि सी ए डे निमित्त रोटरी क्लब ऑफ चोपडा तर्फे शहरातील रोटरी भवन येथे १ जुलै रोजी सायंकाळी शेतकरी, डॉक्टर व चार्टर्ड अकाउंटंट असणाऱ्या क्लब सदस्यांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. तसेच वृक्षारोपण करण्यात येऊन रोटरी वर्षाचा आरंभ करण्यात आला.

        रोटरी क्लब चोपडाचे नवनियुक्त अध्यक्ष रोटे. संजय बारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सन्मान सोहळ्याप्रसंगी मंचावर प्रमुख अतिथी सेवानिवृत्त मुख्याध्यापक डी . व्ही. याज्ञिक यांच्यासह रोटरी डिस्ट्रिकचे अति. जिल्हा सचिव रोटे. नितीन अहिरराव, जिल्हा सहसचिव रोटे. आशिष जयस्वाल, इन्कलेव चेअर रोटे. विलास एस पाटील, क्लब सचिव रोटे. लीना पाटील, सहसचिव रोटे. चंद्रशेखर साखरे आणि प्रकल्प प्रमुख प्रदीप पाटील हे उपस्थित होते. 


        प्रमुख अतिथी डी. व्ही. याज्ञिक यांनी समाज उभारणीत मोलाचे योगदान देणाऱ्या शेतकरी डॉक्टर्स आणि चार्टर्ड अकाउंटंट यांच्या कार्याचे महत्त्व मांडताना त्यांच्या कार्याचा आपल्या मनोगतातून गौरव केला तसेच रोटरीच्या सर्वसमावेशक कार्याबद्दल धन्यवाद व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात क्लब अध्यक्ष रोटे. संजय बारी यांनी क्लबच्या वाटचालीचा आढावा घेत १ जुलै या दिवसाचे महत्त्व विशद केले. सूत्रसंचालन रोटे. विलास पी. पाटील यांना तर आभार प्रदर्शन मानद सचिव रोटे. लीना पाटील यांनी केले. कार्यक्रमास रोटरी सदस्य व त्यांचे परिवार जन मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी रोटरी सदस्य रोटे. निखिल सोनवणे यांनी सपत्नीक रोपाचे पूजन करून रोटरी सदस्यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण केले.

No comments