adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ वाशिममध्ये एकदिवसीय साखळी आमरण उपोषण; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

  सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ वाशिममध्ये एकदिवसीय साखळी आमरण उपोषण; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी   वाशीम प्र...

 सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ वाशिममध्ये एकदिवसीय साखळी आमरण उपोषण; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी  


वाशीम प्रतिनिधी 

(संपादक -:-:हेमकांत गायकवाड)

वाशिम :- पर्यावरणवादी, शिक्षण सुधारक व वैज्ञानिक सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी आज वाशिम येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कॉकरोज जनता पार्टी (CJP), विविध सामाजिक, राजकीय संघटना व संविधानप्रेमी नागरिकांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय साखळी आमरण उपोषण करण्यात आले.

यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या आमरण उपोषणादरम्यान त्यांना दिल्ली पोलिसांनी जबरदस्तीने ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केल्याच्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला. शांततापूर्ण आंदोलन करणे, आपले मत व्यक्त करणे व लोकशाही मार्गाने शासनाकडे मागण्या मांडणे हा भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला दिलेला मूलभूत अधिकार आहे. अशा प्रकारे आंदोलन मोडून काढण्यासाठी बळाचा वापर करणे हे संविधानाच्या लोकशाही मूल्यांच्या विरोधात असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. 


कॉकरोज जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला तसेच सोनम वांगचुक यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी या एकदिवसीय साखळी उपोषणाचे आयोजन करण्यात आले होते.

या आंदोलनात देशातील शिक्षण व्यवस्थेतील वाढत्या त्रुटी, विविध स्पर्धा परीक्षांमधील कथित पेपरफुटीच्या घटना, विद्यार्थ्यांचे प्रश्न, परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकता आणि शिक्षण क्षेत्रातील सर्वांगीण सुधारणांची मागणी करण्यात आली. तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.

जंतर-मंतर, नवी दिल्ली येथे आंदोलनादरम्यान विद्यार्थी व आंदोलनकर्त्यांवर झालेल्या कथित पोलिस कारवाईचा व लाठीमाराचाही निषेध यावेळी करण्यात आला. केंद्र शासनाने शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता आणून विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, परीक्षा प्रक्रियेत विश्वासार्हता निर्माण करावी आणि शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांवर तातडीने निर्णय घ्यावेत, अशी मागणी करण्यात आली.

हे आंदोलन सर्वपक्षीय व सर्वसंघटनांच्या संयुक्त सहभागातून पार पडले. कॉकरोज जनता पार्टीचे महाराष्ट्र समर्थक जगदीश मानवतकर यांच्या नेतृत्वाखाली या साखळी उपोषणाचे नियोजन करण्यात आले.

या साखळी उपोषणात भीम आर्मीचे सुभाष अंभोरे, आम आदमी पार्टीचे राम पाटील डोरले, गजानन धामणे, बाळासाहेब भगत, दिलीप कुमार, दिलीप अंभोरे, डॉ. संजय पडघान, दया अंभोरे, ॲड. सेवेन्द्र सोनोने, सिताराम जाधव, माधव शेवाळे, धम्मदास वाकुडे, अक्षय इंगोले, रामदास कालापाड, रवी ठोके, गणेश वानखडे यांच्यासह विविध पक्ष व संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले.

तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे बालाजी वानखेडे, डॉ. सिद्धार्थ देवळे, कॅप्टन प्रशांत सुर्वे, गजानन जोगदंड, गजानन पाटील दहात्रे, काँग्रेसचे ॲड. दिलीप सरनाईक, राजूभाऊ चौधरी, गजानन गोटे, उज्ज्वल देशमुख, आम आदमी पार्टीचे सुमित खडसे, दत्तराव धांडे, संभाजी ब्रिगेडचे इस्माईल खान पठाण, आंबेडकरी चळवळीचे राजकुमार पडघान यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेट देऊन आंदोलनाला समर्थन दिले.

यावेळी "भारत माता की जय", "इन्कलाब जिंदाबाद", "सोनम वांगचुक तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं", "अभिजीत दिपके तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं" अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

आंदोलन शांततेत व शिस्तबद्ध वातावरणात पार पडले. आंदोलनानंतर विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत भारत सरकारकडे पाठविण्यात आले.

No comments