महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी अमोल टप यांची नियुक्ती अमोल बावस्कार, बुलढाणा (संपादक : हेम...
महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी अमोल टप यांची नियुक्ती
अमोल बावस्कार, बुलढाणा
(संपादक : हेमकांत गायकवाड)
महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेच्या वतीने सामाजिक कार्याची दखल घेत श्री. अमोल लक्ष्मण टप (रा. जवाहरलाल नगर, ता. मलकापूर, जि. बुलढाणा) यांची संघटनेच्या बुलढाणा जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष सुरज एस. यादव यांनी दिलेल्या नियुक्तीपत्रानुसार, संस्थापक अध्यक्ष प्रवीण समाधान भोंटकर यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली. रुग्णसेवा, सामाजिक बांधिलकी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी अधिक प्रभावीपणे कार्य करण्याच्या उद्देशाने ही जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली असल्याचे नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे.
नियुक्तीपत्रानुसार, अमोल टप यांनी संघटनेची शिस्त, नियम व उद्दिष्टांचे पालन करत निष्ठेने कार्य करावे तसेच गरजू, रुग्ण आणि श्रमिक कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सक्रिय भूमिका बजावावी, अशी अपेक्षा संघटनेने व्यक्त केली आहे.
दरम्यान, बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी झालेल्या नियुक्तीबद्दल विविध सामाजिक, राजकीय, कामगार व रुग्णसेवा क्षेत्रातील मान्यवरांनी श्री. अमोल टप यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील सामाजिक व संघटनात्मक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील रुग्णसेवा व कामगारांच्या प्रश्नांना अधिक बळ मिळेल, असा विश्वासही व्यक्त केला जात आहे.

No comments