परमेश्ववर श्रद्धा ठेवून विश्वासाने भक्ती करीत राहावे:- जनार्दन हरीजी महाराज इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) गु...
परमेश्ववर श्रद्धा ठेवून विश्वासाने भक्ती करीत राहावे:- जनार्दन हरीजी महाराज
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
गुरुबोध भगवंताच्या अनुभूतीसाठी असतो परंतु केवळ गुरु बनवून चालत नाही तर गुरूंच्या विचारानुसार आचरण करणे आवश्यक असते. गुरु हे भक्ताच्या मनामध्ये श्रद्धा- सद्भाव निर्माण करून परमतत्त्वाचा परिचय करून देतात व त्याचबरोबर स्वार्थापलीकडे पाहायला शिकवतात. समाज कल्याण, राष्ट्रीय विकासासाठी सतत प्रयत्नशील असणारे आणि समाजाच्या कल्याणाचा विचार करणारे भक्त गुरुंना अधिक प्रिय असतात. परमेश्वरावर श्रद्धा ठेवून विश्वासाने भक्ती करीत राहावे. आपण परमेश्वराला स्मरणात ठेवलं तर परमेश्वरही आपल्याला स्मरणात ठेवतो म्हणून नामस्मरण करत राहावे असे आशीर्वचन जनार्दन हरीजी महाराज यांनी गुरुपौर्णिमा महोत्सवात दिला.
निष्कलंक धाम वढोदा फैजपूर येथे सतपंथ मंदिर संस्थानतर्फे आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सव कार्यक्रमाच्या प्रारंभी नरेंद्र भाई व सीमा बेन तसेच विलास भाई व जिनू बेन भीमपोर सुरत या परिवाराने गुरुपाद्यपूजन केले. याप्रसंगी एकदंत महाराज यांचे पूजन श्री किशोर मोरे व भालचंद्र सोनवणे यांनी केले. सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट संचलित निळकंठ जगन्नाथ गोशाळा साठी नाडीपत्ती जातीची दोन गाय विलासभाई पटेल यांच्या परिवाराने गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने दान केली. तुलसी हेल्थकेअर मध्ये सेवेकरी म्हणून कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मानही याप्रसंगी परिवारातर्फे करण्यात आला.
गुरुपौर्णिमा महोत्सवासाठी उपस्थित विधान परिषद सदस्य आ. नंदकिशोर महाजन तसेच मुख्यमंत्री मदत कक्ष प्रमुख श्री रामेश्वर नाईक, आ. राजूमामा भोळे यांनी आपल्या मनोगतातून आत्मिक समाधानासाठी गुरूंच्या माध्यमातून राहणे आवश्यक असल्याचे सांगितले. मनाने पराभूत झालेल्यांना प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व म्हणजे गुरुतत्त्व आणि गुरूंची कृपा अवर्णनीय असते असेही त्यांनी आपल्या मनोगतातून मांडले.
सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट व नोबेल फाउंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या सतपंथ शिष्यवृत्ती महाअभियानाच्या उपक्रमाची माहिती जयदीप पाटील सर यांनी दिली
अध्ययन केंद्र नवी दिल्ली कडून विद्यावाचस्पती (पी. एचडी.) पदवीने सन्मानित केल्याबद्दल जनार्दन महाराजांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. भाविकांनी गुरु दर्शन व गुरु वचन यासह महाप्रसादाचा लाभ घेतला. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने संजीवनी ब्लड बँके मार्फत सतपंथ चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सतपंथ सेवक परिवार व तरुण कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.

No comments