adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

नालीत अडकलेल्या मुक्या गायीला तरुणांनी दिले जीवनदान..

 नालीत अडकलेल्या मुक्या गायीला तरुणांनी दिले जीवनदान..  उत्तम माने लातुर जि.प्र. (संपादक -:- हेमकांत गायकवाड) निलंगा :- माणुसकी आणि प्राणीप्...

 नालीत अडकलेल्या मुक्या गायीला तरुणांनी दिले जीवनदान.. 


उत्तम माने लातुर जि.प्र.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

निलंगा :- माणुसकी आणि प्राणीप्रेम यांचा सुंदर संगम निलंगा शहरात पाहायला मिळाला. बँक कॉलनी मुख्य रस्त्यालगत सुरू असलेल्या मोठ्या नालीच्या कामात एक निरपराध गाय अडकून पडली होती. बाहेर पडण्यासाठी तिची धडपड सुरू होती, मात्र खोल नालीमुळे ती पूर्णपणे असहाय झाली होती. तिच्या हंबरड्याने परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधले आणि काही प्राणीप्रेमी तरुण देवदूत बनून तिच्या मदतीला धावून आले.

अभिलाष सोनकांबळे, रवी डांगे, सचिन पवार आणि त्यांच्या मित्रमंडळींनी कोणतीही पर्वा न करता नालीत उतरून अत्यंत शिताफीने बचावकार्य सुरू केले. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता केलेल्या अथक प्रयत्नांनंतर अखेर गायीला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. मृत्यूच्या दाढेतून सुटलेल्या त्या मुक्या जीवाला नवजीवन मिळाल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

या तरुणांनी कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता केवळ मानवतेच्या भावनेतून केलेले हे कार्य समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी जीवनात मुक प्राण्यांच्या वेदना समजून त्यांना मदतीचा हात देणारी अशी माणसे समाजाची खरी ताकद असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

दरम्यान, ज्या ठिकाणी नालीचे काम सुरू आहे तेथे पुरेशा सुरक्षा उपाययोजना न केल्यास अशा घटना पुन्हा घडू शकतात. त्यामुळे संबंधित यंत्रणेने बांधकामस्थळी सुरक्षितता, संरक्षक बंधारे आणि इशारा फलक तातडीने उभारावेत, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली.

"माणुसकी म्हणजे केवळ माणसांवर प्रेम करणे नव्हे; तर बोलता न येणाऱ्या मुक जीवांचे प्राण वाचविणेही तितकेच मोठे पुण्य आहे," याची प्रचिती या तरुणांनी आपल्या कृतीतून समाजाला करून दिली. त्यांच्या या प्राणीप्रेमाचा आदर्श प्रत्येक नागरिकाने घ्यावा, अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

No comments