adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

नेट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ मसलग्यात लाक्षणिक उपोषण; दोषींवर कठोर कारवाईची मागणी...

 नेट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ मसलग्यात लाक्षणिक उपोषण; दोषींवर कठोर कारवाईची मागणी...  उत्तम माने लातुर जि.प्र. संपादक हेमकांत गायकवाड...

 नेट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ मसलग्यात लाक्षणिक उपोषण; दोषींवर कठोर कारवाईची मागणी... 


उत्तम माने लातुर जि.प्र.

संपादक हेमकांत गायकवाड 

निलंगा:- नेट (NET) परीक्षा पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करावी तसेच केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, या मागण्यांसाठी निलंगा तालुक्यातील मौजे मसलगा येथे रविवारी (दि. १९ जुलै) समस्त गावकरी मंडळाच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत कथित पेपरफुटी प्रकरणाचा तीव्र निषेध केला. स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकारांमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. विद्यार्थ्यांचा परीक्षाव्यवस्थेवरील विश्वास अबाधित ठेवण्यासाठी केंद्र शासनाने पारदर्शक आणि कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

मसलगा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत शांततापूर्ण वातावरणात हे लाक्षणिक उपोषण पार पडले. आंदोलनादरम्यान शासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष सुरूच राहील, असा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला. यावेळी छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष तथा शेतकरी नेते दासभैय्या साळुंके, समस्त गावकरी मंडळाचे पदाधिकारी, ग्रामस्थ तसेच विविध क्षेत्रांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना शेतकरी नेते तथा सामाजिक कार्यकर्ते दासभैय्या साळुंके यांनी सांगितले की, "पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करून विद्यार्थ्यांचा परीक्षाव्यवस्थेवरील विश्वास पुन्हा प्रस्थापित करावा. अन्यथा विद्यार्थी व जनतेच्या सहभागातून आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल."

No comments