adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या पाई वारकऱ्यांसाठी राहाता येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने केळी, बिस्कीट व चहाचे भव्य सेवाभावी वाटप

  आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या पाई वारकऱ्यांसाठी राहाता येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने केळी, बिस्कीट व चहाचे भव्य सेवाभावी वाटप अ...

 आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या पाई वारकऱ्यांसाठी राहाता येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने केळी, बिस्कीट व चहाचे भव्य सेवाभावी वाटप


अजीजभाई शेख /राहाता 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

राहाता -- महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आणि भक्ती परंपरेचा मुकुटमणी असलेल्या पंढरपूरच्या आषाढी वारीला संपूर्ण राज्यातून लाखो वारकरी पायी प्रस्थान करत आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याप्रमाणेच असंख्य छोट्या-मोठ्या दिंड्या "जय जय राम कृष्ण हरी" चा गजर करत विठ्ठलाच्या भेटीसाठी मार्गस्थ झाल्या आहेत.

या भक्तीच्या महापुरात खऱ्या अर्थाने _सेवा हेच दैवत_ आहे हा विचार घेऊन  वंचित बहुजन आघाडी, अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हा संघटक मा. दीपक कसबे  यांच्या नेतृत्वाखाली आणि इतर सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या सहकार्याने राहाता शहरात पाई वारकऱ्यांसाठी भव्य सेवाशिबिराचे आयोजन करण्यात आले आज सकाळी दहा वाजल्यापासूनच राहाता शहरातील मुख्य मार्गावर हे सेवाशिबिर सुरू करण्यात आले. रखरखीत उन्हात 10-15 किलोमीटर चालून आलेल्या वारकऱ्यांना तात्काळ दिलासा मिळावा यासाठी पुढील सेवा देण्यात आल्या:

अल्पोपहार वाटप  प्रत्येक वारकऱ्याला केळी, बिस्कीटचे पाकीट व चहा देण्यात आला.

 माऊलींच्या आशीर्वादाने शिल्लक राहिलेले बिस्कीट व केळी राहाता येथील पी.जे.एस.एस शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना माऊलीचा प्रसाद म्हणून वाटण्यात आले.

या सेवेचा शेकडो वारकऱ्यांनी लाभ घेतला. यामध्ये लहान मुले, महिला, वृद्ध आणि दिव्यांग वारकरी मोठ्या संख्येने सहभागी होते. सेवा घेतल्यानंतर अनेक वारकऱ्यांनी गहिवरून _"आम्हाला विठ्ठलाचेच दर्शन झाले"_ अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. संपूर्ण परिसर "ज्ञानोबा माऊली तुकाराम" आणि "जय हरी विठ्ठल" च्या जयघोषाने दुमदुमून गेला होता याप्रसंगी बोलताना जिल्हा संघटक मा. दीपक कसबे म्हणाले,  

_"डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजा यांच्या विचारसरनी नुसार आम्ही माणुसकीची जपणूक करून परमार्थ साधन्याचा संकल्प केला पाहिजे. वारी हा केवळ धार्मिक सोहळा नाही तर तो सामाजिक ऐक्याचा, बंधुभावाचा आणि माणुसकीचा संदेश आहे. वाटेत चालणाऱ्या वारकऱ्याला एक घोट पाणी आणि दोन घास अन्न देणे म्हणजेच खऱ्या अर्थाने विठ्ठलाची पूजा आहे. वंचित बहुजन आघाडी ही नेहमीच समाजातील वंचित, शोषित आणि कष्टकरी जनतेच्या सोबत राहिली आहे आणि भविष्यातही राहील."_

यावेळी पदाधिकारी व मान्यवरांची उपस्थितीया सेवाकार्यात समाजसेवक अण्णासाहेब बनसोडे, माजी सरपंच रावसाहेब बनसोडे  साकुरी, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा नेते भरत निकाळे, अनिल आवारे, किशोर पठारे, सनी बनसोडे, रितेश जाधव, बापू बारसे, आदिनाथ बनसोडे अनुराग निकम यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी शिस्तबद्ध पद्धतीने हे वाटप पार पाडले. वंचित बहुजन आघाडी उत्तर आहिल्या नगर जिल्हा...

No comments