adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

हृदयद्रावक! विहिरीच्या पूजेच्या बहाण्याने अंध माय-लेकाला विहिरीत ढकलले; साडेतीन वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू, सासू व पती गजाआड. सुरुवातीला अपघाताचा बनाव; पोलिसांच्या सखोल चौकशीत सासू आणि पतीचा क्रूर चेहरा आला समोर ! यावल तालुक्यातील धक्कादायक घटना

  हृदयद्रावक! विहिरीच्या पूजेच्या बहाण्याने अंध माय-लेकाला विहिरीत ढकलले; साडेतीन वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू, सासू व पती गजाआड.    सुरुवात...

 हृदयद्रावक! विहिरीच्या पूजेच्या बहाण्याने अंध माय-लेकाला विहिरीत ढकलले; साडेतीन वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू, सासू व पती गजाआड.

  सुरुवातीला अपघाताचा बनाव; पोलिसांच्या सखोल चौकशीत सासू आणि पतीचा क्रूर चेहरा आला समोर ! 

 यावल तालुक्यातील धक्कादायक घटना   


भरत कोळी यावल  : 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

यावल तालुक्यातील किनगाव शिवारात नात्यांना काळिमा फासणारी आणि मानवतेला हादरवून सोडणारी अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विहिरीच्या पूजेच्या बहाण्याने अंध महिला आणि तिच्या साडेतीन वर्षीय अंध मुलाला विहिरीत ढकलल्याची घटना समोर आली असून, या घटनेत निष्पाप बालकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर महिलेने प्रसंगावधान राखत जीव वाचवला. सुरुवातीला हा प्रकार अपघात असल्याचा बनाव करण्यात आला होता. मात्र, पोलिसांच्या सखोल चौकशीनंतर सासू आणि पतीचा कथित क्रूर चेहरा समोर आला. याप्रकरणी यावल पोलिसांनी पती व सासूला अटक करून खून आणि खुनाच्या प्रयत्नासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

ही घटना १३ जुलै २०२६ रोजी सकाळी सुमारे ८.३० वाजता किनगाव शिवारातील आरोपींच्या मालकीच्या शेतातील विहिरीजवळ घडली. फिर्यादी सरस्वती स्वप्निल पाटील (वय २७) आणि तिचा पती स्वप्निल भागवत पाटील (वय ३४) हे विहिरीची पूजा करण्यासाठी शेतात गेले होते. त्यावेळी आरोपी सासू आशाबाई भागवत पाटील हिने सरस्वती आणि तिचा साडेतीन वर्षीय मुलगा कृष्णा यांना विहिरीत जोराचा धक्का दिल्याचा आरोप आहे. विहिरीत पडल्यावर सरस्वतीने विहिरीतील लाकडी फाउंडेशनचा आधार घेतल्याने तिचा जीव वाचला, मात्र कृष्णा पाण्यात बुडाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

घटनेनंतर सुरुवातीला हा प्रकार अपघाती असल्याचे सांगण्यात आले. जखमी सरस्वतीला उपचारासाठी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे दाखल करण्यात आले. मानसिक धक्क्यामुळे तिने सुरुवातीला कोणताही जबाब दिला नसल्याने पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, घटनेतील संशयास्पद बाबी लक्षात घेऊन लहान मुलाच्या अंत्यसंस्कारानंतर पोलिसांनी रात्री उशिरा महिलेची सखोल चौकशी केली. यावेळी तिने सासूने मुद्दाम विहिरीत ढकलल्याचा तसेच या कटात पतीचाही सहभाग असल्याचा गंभीर आरोप केला.

पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सरस्वती या सुमारे ७० टक्के दृष्टिहीन असून तिचा पती स्वप्निल हा पूर्णतः दृष्टिहीन आहे. गर्भधारणेदरम्यान सोनोग्राफीमध्ये होणारे बाळही दृष्टिहीन असण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली होती. त्यानंतर आरोपी पतीने गर्भपात करण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप आहे. मात्र, सरस्वतीने गर्भपातास नकार देत मुलाला जन्म दिला. याच कारणावरून पती-पत्नीत सातत्याने वाद होत होते. या वादामुळे सरस्वती गेल्या अडीच वर्षांपासून माहेरी राहत होती. अखेर या कौटुंबिक वादाचे रूप या भीषण घटनेत झाल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २५४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) (खून), १०९(१) (खुनाचा प्रयत्न) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी स्वप्निल भागवत पाटील आणि आशाबाई भागवत पाटील यांना ताब्यात घेतले असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

No comments