विद्येची शिदोरी, उज्ज्वल भवितव्याची हमी; नवापूर चर्मकार समाजाचा स्तुत्य उपक्रम. नवापूर येथे शैक्षणिक साहित्य वाटप सोहळा उत्साहात; शेकडो विद्...
विद्येची शिदोरी, उज्ज्वल भवितव्याची हमी; नवापूर चर्मकार समाजाचा स्तुत्य उपक्रम.
नवापूर येथे शैक्षणिक साहित्य वाटप सोहळा उत्साहात; शेकडो विद्यार्थ्यांना मिळाला शिक्षणाचा आधार.
(नवापूर प्रतिनिधी : पंकज अहिरे)
(संपादक : हेमकांत गायकवाड)
चर्मकार समाज, नवापूर तसेच बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने नवापूर नगर परिषद टाऊन हॉल येथे शैक्षणिक साहित्य वाटपाचा भव्य कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. नवापूर, चिंचपाडा, विसरवाडी, खांडबारा तसेच गुजरात राज्यातील सोनगड परिसरातील इयत्ता पहिलीपासून उच्च शिक्षण घेणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या, लेखन साहित्य व इतर आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध केंसररोग तज्ञ डॉक्टर दिलीप रामदास पवार होते, तर कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य धर्मवीर आध्यात्मिक सेना, शिवसेनेचे समन्वयक विशाल संजय जाधव (ठाणे) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मोहन त्रंबक पवार, मगन वनाजी मेहेते,माधवराव छगन ठाकरे, सुभाष रामलाल जाधव, किरण लक्ष्मण वाघ, दीपक पंढरीनाथ अनुष्ठान, भास्कर नारायण पवार, गंगाराम नाथू झांजरे, अशोक तुकाराम माथणे,संजय ताराचंद जाधव, प्रशांत कडू माळी (वाघाळे), कमलेश प्रकाश अहिरे (नाशिक) तसेच अमरदीप समुहाचे अध्यक्ष शंकर लक्ष्मीबाई भिका अहिरे (मुंबई, अंधेरी) सुरेश चव्हाण, शंकर अहिरे ,हेमंत अहिरे, प्रकाश जाधव, किसन अहिरे ,शैलेंद्र अहिरे,जीवन आहिरे,धनराज आहिरे,संतोष अहिरे,विजय अहिरे,संजय आहिरे,विजय अहिरे,चंदू आहिरे,
यांची प्रमुख उपस्थिती लाभली.दीपप्रज्वलनानंतर
महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जितेंद्र अहिरे यांनी केले. आपल्या प्रास्ताविकातून त्यांनी शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असून विद्यार्थ्यांना शैक्षणिक बळ देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आल्याचे सांगितले. पालक प्रतिनिधी म्हणून रवींद्र पवार यांनी विद्यार्थ्यांनी उपलब्ध संधींचा लाभ घेत उच्च शिक्षण घेऊन समाजाचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन केले.
यानंतर मोहन त्रंबक पवार, माधवराव छगन ठाकरे, दीपक पंढरीनाथ अनुष्ठान तसेच मगन वनाजी मेहेते नवापूर तालुका चर्मकार समाजाचे अध्यक्ष छोटू अहिरे यांनी आपल्या मनोगतातून शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी जिद्द, परिश्रम आणि सातत्याच्या बळावर यश संपादन करावे, असा प्रेरणादायी संदेश दिला.
अध्यक्षीय समारोपात डॉ. दिलीप रामदास पवार यांनी शिक्षण हेच समाजाच्या सर्वांगीण प्रगतीचे सर्वात प्रभावी साधन असल्याचे सांगत प्रत्येक विद्यार्थ्याने ज्ञान, संस्कार आणि कष्ट यांच्या बळावर जीवनात मोठी भरारी घ्यावी, असे प्रेरणादायी मार्गदर्शन केले. समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे गरजू, होतकरू व गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक बळ मिळाल्याची भावना पालकांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन महेंद्र अहिरे यांनी केले, तर प्रशांत ठाकरे यांनी उपस्थित मान्यवर, देणगीदार, पालक, विद्यार्थी तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले. समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अशा प्रकारचे उपक्रम भविष्यातही सातत्याने राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी
चर्मकार समाजाचे अध्यक्ष छोटू अहिरे , जितेंद्र अहिरे, विजय तिजविज, रवींद्र पवार, लक्ष्मण चव्हाण, महेंद्र अहिरे ,पंकज अहिरे कमलेश ठाकरे, नथ्थू अहिरे, वामन अहिरे, संतोष अहिरे, प्रदीप अहिरे प्रेम ठाकरे , हिरु अहिरे, प्रदिप अहिरे,
आदिंनी परीश्रम घेतले.



No comments