खिर्डी बु.रस्ता दुरुस्तीसाठी ग्रा.प. सदस्यांसह ग्रामस्थांचे २६ जुलैपासून बेमुदत उपोषणास्त्र ! सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांसह सामाजिक संघटनांचा ...
खिर्डी बु.रस्ता दुरुस्तीसाठी ग्रा.प. सदस्यांसह ग्रामस्थांचे २६ जुलैपासून बेमुदत उपोषणास्त्र ! सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांसह सामाजिक संघटनांचा जाहीर पाठींबा.
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रावेर तालुक्यातील खिर्डी बुद्रुक येथील बस स्टॉप ते जि. प. मराठी शाळेदरम्यानच्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून वारंवार पत्रव्यवहार करूनही प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही न झाल्याने ग्रामपंचायत सदस्य गणेश मनोहर देवगिरकर यांच्यासह ग्रामस्थ दि २६ पासून बेमुदत उपोषणाला बसणार बसले आहेत,यापूर्वीही २४/०६/२०२५ आणि ०२/०७/२०२५ रोजी प्रशासनाला निवेदने देण्यात आली होती, तसेच प्रशासनाच्या आश्वासनानंतर उपोषण स्थगित करण्यात आले होते; मात्र अद्यापही रस्त्याची दुरुस्ती न झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. याप्रकरणी प्रजिमा १४ वर साचणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन करणे, रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या साईड पट्ट्या मुरुमाने भरून बारीक कच टाकणे, रस्त्यावरील खोल भागात डांबरी अथवा सिमेंट रस्ता करून पाण्याचा निचरा करणे आणि बस स्टॅंड ते टन काटा दरम्यानचा रस्ता तात्काळ दुरुस्त करणे अशा प्रमुख मागण्या सार्वजनिक बांधकाम उपविभागाकडे करण्यात आल्या आहेत.
प्रशासनाला दिलेल्या इशाऱ्यानुसार २६ जुलै रोजी सकाळी ९ वाजता पासून ऐनपूर रोड खिर्डी बुद्रुक येथे जेडीसीसी बँकेसमोर हे उपोषण आंदोलन सुरू झाले असून याची प्रतिलिपी जळगावचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, रावेरचे तहसीलदार, निंभोरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि खिर्डी बुद्रुकचे ग्रामसेवक यांना पाठवण्यात आली आहे. या प्रसंगी खिर्डी बुद्रुक येथील प्रभारी सरपंच अतुल पाटील,माजी पं.स. सदस्य दीपक पाटील, योगेश जाधव, अँड.चंद्रजीत पाटील, गफूर कोळी, किरण नेमाडे, चिराग नेमाडे,विजय कोळी, माजी पं.स.सदस्य घनश्याम पाटील, तत्पर फाउंडेशन चे अध्यक्ष कांतिलाल गाढे, उपाध्यक प्रदीप महाराज,सचिव शेख इद्रीस, चंद्रकांत कोळी, गुणवंत पाटील, प्रवीण धुंदले, संकेत पाटील, सादिक पिंजारी शेख सलमान, निखिल महाजन, रफिक बेग, डॉ सुनील कोल्हे, ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष प्रल्हाद कोचुरे, मा. ग्रा. पं. सदस्य जगदीश कोचूरे, यांनी पाठिंबा देत उपोषण स्थळी भेट दिली यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित आहे दरम्यान, तलाठी हर्षल पाटील, पोलीस पाटील रितेश चौधरी,निंभोरा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक ममता तडवी, सतीश सानप, सर्फराज तडवी, उमेश नरवाडे,गोपनीय शाखेचे अमोल वाघ, यांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे
दरम्यान,रावेर बांधकाम विभागाचे श्री येवले यांनी उपोषण स्थळी भेट देत रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती करण्यात येईल, असे पत्र देऊन उपोषण मागे घेण्यासाठी सांगितले परंतु पूर्ण दर्जेदार रस्ता होत नाही तोवर उपोषण सुरू राहील अशी भूमिका उपोषण कर्ते गणेश देवगिरीकर यांनी मांडली.


No comments