adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

प्रताप विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूल, चोपडा येथे विठ्ठल नामाचा महागजर

 प्रताप विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूल, चोपडा येथे विठ्ठल नामाचा महागजर चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा : चोपडा एज्युके...

 प्रताप विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूल, चोपडा येथे विठ्ठल नामाचा महागजर


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा : चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित प्रताप विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूल, चोपडा येथे आषाढी एकादशी निमित्त भक्तिमय वातावरणात दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्मिणी व वारकरी वेशभूषेत सहभागी होत भजन, अभंग, गायन, टाळ-मृदुंग, रिंगण, फुगडी, कलानृत्य तसेच पारंपरिक खेळांचे आकर्षक सादरीकरण केले. "माऊली... माऊली..." आणि "जय जय रामकृष्ण हरी" या नामघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक श्री. रजीश बी., उपमुख्याध्यापिका सौ.  निखिला एम व संस्थेचे समन्वयक श्री. गोविंदभाई गुजराथी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व पालखी पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन चेतना बडगुजर व क्रीडाशिक्षक समाधान माळी सर यांनी केले, तर सूत्रसंचालन दीपक सर व  विशाल सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. यावेळी मान्यवरांनी सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले.




No comments