adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जीवनधारा फाउंडेशनच्या सहकार्याने आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

 जीवनधारा फाउंडेशनच्या सहकार्याने आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप  चंद्रकांत पाटील, विचखेडा   (संपादक : हेमकांत गायकवाड) च...

 जीवनधारा फाउंडेशनच्या सहकार्याने आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप 


चंद्रकांत पाटील, विचखेडा  

(संपादक : हेमकांत गायकवाड)

चोपडा तालुक्यातील खाऱ्यापाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मंगळवार, दि. ७ जुलै २०२६ रोजी जीवनधारा फाउंडेशन, चोपडा यांच्या सहकार्याने आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वितरणाचा उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमांतर्गत शाळेतील इयत्ता चौथीच्या सर्व ९९ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देत त्यांच्या शैक्षणिक प्रगतीस हातभार लावण्याचा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले. 


कार्यक्रमास गावचे पोलीस पाटील कलरसिंग बारेला, ग्रामस्थ सदस्य राजाराम पावरा, तुकाराम पावरा, नानू पावरा, प्रमिलाताई, भुरीताई, मुख्याध्यापक विजय कचवे, शिक्षक रवींद्र पाटील, कैलास बारेला तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी जीवनधारा फाउंडेशनच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत, अशा उपक्रमांमुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळत असल्याचे मत व्यक्त केले.

No comments