अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणा विरोधात निलंग्यात एल्गार.. ३० जुलै निलंग्याच्या महामोर्चासाठी जोरदार रणशिंग.. लातूर उत्तम माने (संपादक -...
अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणा विरोधात निलंग्यात एल्गार..
३० जुलै निलंग्याच्या महामोर्चासाठी जोरदार रणशिंग..
लातूर उत्तम माने
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या प्रस्तावाविरोधात अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी कृती समिती, निलंगा यांच्या वतीने शासकीय विश्रामगृह, निलंगा येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत उपवर्गीकरणाच्या प्रस्तावावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली तसेच ३० जुलै रोजी निलंगा येथे होणारा तालुकास्तरीय महामोर्चा अभूतपूर्व करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
बैठकीत उपस्थित विविध समाजघटकांच्या प्रतिनिधींनी अनुसूचित जातींच्या घटनात्मक अधिकारांवर कोणताही आघात सहन केला जाणार नसल्याचे स्पष्ट केले. उपवर्गीकरणामुळे अनुसूचित जातींच्या एकात्मतेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त करत, संविधानाने दिलेल्या सामाजिक न्यायाच्या तत्त्वांना धक्का पोहोचेल, अशी भूमिका मांडण्यात आली. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने उपवर्गीकरणाचा निर्णय तत्काळ रद्द करून राज्यात सामाजिक सलोखा अबाधित ठेवावे या आंबेडकर वादी जनतेच्या भावनेकडे दुर्लक्ष केले तर सरकारला दूरगामी परिणाम भोगावे लागतील यासाठी समस्त आंबेडकरी जनता या विचारांच्या विरोधात रस्त्यावर येऊन तीव्र स्वरूपात आंदोलन करुन राज्य सरकारला सळो की,पळो केल्याशिवास स्वस्त बसणार नाहीत दोन्ही समाजात जातीय तेढ निर्माण करून राज्य सरकार काय साध्य करणार असा सूरही या बैठकीत काढण्यात आला. याबाबत राज्यसरकार मार्फत वर्गीकरणाबाबत झालेला संभ्रम दूर करावा.या प्रमुख मागणीसाठी निलंगा येथील.समस्त आंबेडकरवादी पक्ष, संघटना, संस्था तसेच निलंगा येथील चांभार,मातंग,ढोर,मुस्लीम.,धनगर,ओबीसी समाजातील प्रतिनिधी उपस्थित राहून मोर्चास पाठिंबा दिला.
मोर्चाच्या तयारीसाठी तालुक्यात जाहीर बैठकीचे आयोजन करण्याचे आवाहनही करण्यात आले.
बैठकीत निलंगा शहर व तालुक्यातील प्रत्येक गावातून मोठ्या संख्येने मोर्चास महिला, युवक, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी निलंग्याच्या महामोर्चात सहभागी व्हावे, यासाठी व्यापक जनजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रत्येक भागातून वाहनांची व्यवस्था करून हजारोंच्या संख्येने नागरिकांना मोर्चात सहभागी करण्यासाठी नियोजन आखण्यात आले.
उपस्थितांनी संविधान, सामाजिक न्याय, समता आणि बंधुतेच्या मूल्यांच्या संरक्षणासाठी लोकशाही व संविधानिक मार्गाने संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला. शासनाने समाजात मतभेद निर्माण करणाऱ्या निर्णयांऐवजी विश्वास, संवाद आणि सामाजिक सलोखा वृद्धिंगत करणारी भूमिका स्वीकारावी, अशी अपेक्षाही बैठकीत व्यक्त करण्यात आली.
सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी विलास सूर्यवंशी हे होते यावेळी रजनीकांत कांबळे,अंकुश ढेरे, प्रा. रोहित बनसोडे, धम्मानंद काळे,दाजीबा कांबळे, अर्जुनाप्पा कटके (ढोर समाज), देविदास धैर्य ,खाटिक समाजाच्या वतीने डॉ. प्रमोद हातागळे, मातंग समाजाच्या वतीने सतीश कांबळे,उल्हास वाघमोडे,चर्मकार समाजाच्या वतीने काशिनाथ जाधव,सुभाष भालके,रणवीर भालके, विजय जाधव,धनगर समाजाच्या वतीने झटिंग (अण्णा)म्हेत्रे,मुस्लिम समाजाच्या वतीने शेख सिराज,हज्जू सय्यद, यांच्यासह, नागोराव गायकवाड (दाजी) विजयकुमार सूर्यवंशी,प्रकाश गायकवाड, सूर्यकांत कांबळे,अंगद गवळी ,प्रकाश कांबळे, दाजीबा कांबळे,दिगंबर सूर्यवंशी, देवदत्त सूर्यवंशी, अनंत कांबळे, बंटी कांबळे, शुभम सूर्यवंशी मोहन,सुभाष कांबळे,मोहन वाघमारे, तानाजी सुरवसे,प्रदीप सोनकांबळे,मुन्ना सुरवसे,रोहन सुरवसे,गौतम कांबळे,संदीप कांबळे, लहू ढेरे,प्रविण कांबळे,धनराज कांबळे,संजय हत्तरगे, धनराज कांबळे,यांच्यासह विविध समाजघटकांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments