श्रमदानातुन गटारी स्वच्छतेचा निर्धार; चोपडा नगरपरिषदेचा उपक्रम चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा : स्वच्छ सर्वेक्षण 2026 ...
श्रमदानातुन गटारी स्वच्छतेचा निर्धार; चोपडा नगरपरिषदेचा उपक्रम
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा : स्वच्छ सर्वेक्षण 2026 अंतर्गत चोपडा नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागामार्फत शहरातील गटारींची सर्वंकष साफसफाई करण्याच्या उद्देशाने "स्वच्छ श्रमदान मोहीम" राबविण्यात येत आहे. या मोहिमेद्वारे शहरातील सर्व गटारी स्वच्छ करून पावसाळ्यात पाण्याचा निचरा सुरळीत व्हावा तसेच शहर स्वच्छ, सुंदर व निरोगी राहावे, हा नगरपरिषदेचा मानस आहे.
सदर श्रमदान मोहिमेची सुरुवात शेतपुरा, केजीएन कॉलनी आणि मुस्तफा कॉलनी येथून करण्यात आली असून आज, दि. 09 जुलै 2026 रोजी धनवाडी फाटा परिसरातील कॉलनी भागात मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
या प्रसंगी चोपडा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. नम्रता पाटील, उपनगराध्यक्ष श्री. पंकजदादा बोरोले, आरोग्य सभापती श्री. रमेश शिंदे, मा.मुख्याधिकारी श्री.गणेश शिंदे तसेच सन्माननीय नगरसेवक श्री. रमाकांत ठाकूर, श्रीमती वंदना पाटील, श्री.सैय्यद फरमान अली यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली श्रमदान मोहिमेला प्रारंभ झाला.
या मोहिमेअंतर्गत बोरोले नगर क्रमांक 1 व 2, पंकज नगर, पवार नगर, मधुबन नगर, चारुशिला नगर आणि शारदा नगर या भागांतील गटारींची साफसफाई करण्यात येत आहे.
यावेळी नगराध्यक्षा सौ. नम्रता पाटील व उपनगराध्यक्ष श्री. पंकजदादा बोरोले यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत कचरा गटारीत टाकू नये. घरातून निर्माण होणारा ओला व सुका कचरा नगरपरिषदेच्या घंटागाडीतच द्यावा. गटारींमध्ये कचरा टाकल्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा अडतो, गटारी तुंबतात आणि सफाई कर्मचाऱ्यांना गाळ व कचरा काढताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारून नगरपरिषदेला सहकार्य करावे.
सदर श्रमदान मोहिमेचे नियोजन व अंमलबजावणी स्वच्छता निरीक्षक श्रीमती दिपाली साळुंके व श्री. जयेश भोंगे यांनी परिश्रम घेऊन मुकादन यांनी नियोजन करुन श्रमदान मोहिम पार पाडली.
चोपडा नगरपरिषदेने नागरिकांना शहर स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी ठेवण्यासाठी नगरपरिषदेच्या स्वच्छता उपक्रमांना सक्रिय सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

No comments