बहिणाबाई चौधरी विद्यापीठात सहकार अभ्यासक्रमाला मान्यता; सिनेट सदस्य नरेंद्रभाऊ नारखेडे यांनी दिली माहिती नरेंद्रभाऊ नारखेडे फैजपूर इदू ...
बहिणाबाई चौधरी विद्यापीठात सहकार अभ्यासक्रमाला मान्यता; सिनेट सदस्य नरेंद्रभाऊ नारखेडे यांनी दिली माहिती 
नरेंद्रभाऊ नारखेडे फैजपूर
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने नवीन सहकार पदवी अभ्यासक्रमाला नुकतीच मान्यता दिली आहे अशी माहिती सिनेट सदस्य नरेंद्र भाऊ नारखेडे यांनी दिली सहकार क्षेत्रात युवकांना नोकरीच्या भरपूर मोठ्या प्रमाणात संधी आहे यासाठी सहकार विषय प्रशिक्षित पदवीधारक उमेदवारांची गरज आहे या क्षेत्रात युवकांना संधी उपलब्ध व्हावी यासाठी सहकार पदवी अभ्यासक्रम सुरू करावा असा प्रस्ताव विद्यापीठाचे सिनेट अधिवेशनात सिनेट सदस्य नरेंद्रभाऊ नारखेडे यांनी मांडला व विस्तृत चर्चा घडवून आणली असता कुलगुरू व्ही एल माहेश्वरी यांनी त्याचवेळी तत्वतः मान्यता दिली होती या अभ्यासक्रमाचे रचना ठरविणे साठी राजेंद्र नंनवरे व्यवस्थपन परिषद सदस्य यांचे अध्यक्षतेखाली नरेंद्रभाऊ नारखेडे व जगताप मॅडम प्राचार्य जगदीश पाटील यासह समिती स्थापन करण्यात आली होती
यासाठी नरेंद्रभाऊ नारखेडे यांनी सतत पाठपुरावा सुरू ठेवला होता या प्रस्तावाला विद्यापीठाचे अभ्यास परिषदेत मान्यता देण्यात आली आहे विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावा व पदवी संपादन करावी या पदवी धारकांना सहकारी बँक कारखाना पतसंस्था सूतगिरणी दुधसंघ अन्य सहकारी संस्था मध्ये नोकरीच्या संधी मिळतील या अभ्यासक्रमाचे उपलब्धता करिता कुलगुरू व्ही एल माहेश्वरी प्र कुलगुरू एस टी इंगळे राजेंद्र नंनवरे कुलसचिव विनोद पाटील अमोल नाना पाटील सहकार प्रशिक्षण केंद्र सातारचे अध्यक्ष संजय बिर्ला उपाध्यक्ष शरद जाधव जगताप मॅडम यांचे अनमोल सहकार्य लाभले असून सहकारी संस्था मजबूत करणे व युवकांना रोजगार निर्माण करणे ही भूमिका यामागे असल्याची भावना सिनेट सदस्य नरेंद्रभाऊ नारखेडे यांनी व्यक्त केली
No comments