adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अयोध्या श्रीराम मंदिर लुटीच्या निषेधार्थ यावलमध्ये रामरक्षा पठण व महाआरती शिवसेना व श्रीराम भक्तांचा उत्स्फूर्त सहभाग; श्रीहनुमान मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण

 अयोध्या श्रीराम मंदिर लुटीच्या निषेधार्थ यावलमध्ये रामरक्षा पठण व महाआरती शिवसेना व श्रीराम भक्तांचा उत्स्फूर्त सहभाग; श्रीहनुमान मंदिर परि...

 अयोध्या श्रीराम मंदिर लुटीच्या निषेधार्थ यावलमध्ये रामरक्षा पठण व महाआरती

शिवसेना व श्रीराम भक्तांचा उत्स्फूर्त सहभाग; श्रीहनुमान मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण 


भरत कोळी यावल

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

यावल :- अयोध्या येथील श्रीराम मंदिरात झालेल्या कथित लुटीच्या घटनेच्या निषेधार्थ यावल शहरातील श्रीराम भक्त व शिवसेनेच्या वतीने चावडीजवळील श्रीहनुमान मंदिरात भव्य रामरक्षा पठण व महाआरतीचे आयोजन करण्यात आले. सायंकाळी ६ वाजता झालेल्या या धार्मिक कार्यक्रमात मोठ्या संख्येने शिवसैनिक, युवासैनिक आणि रामभक्त सहभागी झाले होते. यावेळी उपस्थितांनी प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेसमोर रामरक्षा पठण करून महाआरती केली तसेच श्रीराम मंदिराविषयीची श्रद्धा आणि हिंदू समाजाची एकजूट व्यक्त केली. कार्यक्रमास शिवसेना उपनेते गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख योगिराज पाटील, जिल्हा उपसंघटक अशोक शिंदे, उपजिल्हाप्रमुख गोपाळ चौधरी, नगराध्यक्ष सौ. छाया पाटील, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक अतुल पाटील, शिवसेना गटनेते सागर चौधरी, शहरप्रमुख जगदीश कवडीवाले, तालुकाप्रमुख शरद कोळी, उपतालुका संघटक पप्पू जोशी, माजी तालुकाप्रमुख कडू पाटील, नगरसेवक पराग सराफ, माजी नगराध्यक्ष सौ. सुरेखा कोळी, नगरसेविका वैशाली बारी, उपशहरप्रमुख संतोष धोबी, योगेश चौधरी, योगेश राजपूत, युवासेना उपजिल्हा संघटक सागर देवांग, युवासेना शहरप्रमुख विजय पंडित, उपशहरप्रमुख पिंटू कुंभार, सुरेश कुंभार, भाऊसाहेब धनगर, सारंग बेहेडे, मयूर खर्चे, गौरव जोशी, नरेंद्र शिंदे, निलेश बारी, महेश वाणी, किशोर माळी, संतोष वाघ, मनोज करणकर, गणेश कोलते यांच्यासह शिवसेना, युवासेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी प्रभू श्रीरामांच्या चरणी प्रार्थना करत अयोध्या श्रीराम मंदिरावरील कथित लुटीच्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला. कार्यक्रमामुळे श्रीहनुमान मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला.

No comments