अडावद पोलिसांची बेकायदेशीर दारूविरोधात धडक कारवाई; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल अडावद (प्रतिनिधी): (संपादक -:- हेमकांत गायकवाड) जळगाव जिल्ह्य...
अडावद पोलिसांची बेकायदेशीर दारूविरोधात धडक कारवाई; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
अडावद (प्रतिनिधी):
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जळगाव जिल्ह्यात बेकायदेशीर दारू निर्मिती व विक्रीला आळा घालण्यासाठी अडावद पोलिसांनी धडक कारवाई करत संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक, जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली अडावद पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. कारवाईत पोलीस उपनिरीक्षक सचिन नांगरे, पोहेकॉ अन्वर तडवी तसेच पोहेकॉ सुनिल तायडे यांनी सक्रिय सहभाग घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन नांगरे करीत आहेत. दरम्यान, आपल्या परिसरात कुठेही बेकायदेशीर दारू निर्मिती अथवा विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधून सहकार्य करावे, असे आवाहन अडावद पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

No comments