मलकापूरात राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) मध्ये भव्य पक्षप्रवेश अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मलकापूर शहरात आज राष...
मलकापूरात राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) मध्ये भव्य पक्षप्रवेश
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मलकापूर शहरात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजितदादा गट) मध्ये मोठ्या उत्साहात जाहीर पक्षप्रवेश सोहळा पार पडला. महाराष्ट्राचे मा. पालकमंत्री मकरंद जाधव-पाटील यांच्या हस्ते अनेक कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या विकासवादी विचारांना साथ देण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी उबाठा गटाच्या नगरसेविका सायमा बी शेख निजाम तसेच रफिकसेठ बर्तनवाले यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांच्या या निर्णयाचे उपस्थित मान्यवरांनी स्वागत करत भावी राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
पक्षात प्रवेश करणारे कार्यकर्ते
शेख रफीक बर्तन वाले, शेख करीम भाई, शेख नाजिम भाई, युसूफ भाई, यूनुस भाई, शेख शब्बीर भाई, हामिद भाई, आजम बेग, सलमान खान, शेख सोहेल, शेख राजिक, शेख सादिक ठेकेदार, आबिद ट्रेलर, शकील बाबू, उस्मान ठेकेदार, हफीज खान आणि शाहरुख खान यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
मान्यवरांची उपस्थिती
या पक्षप्रवेश कार्यक्रमाला जिल्हा कार्याध्यक्ष प्रसाद नारायणराव जाधव, जिल्हा उपाध्यक्ष अरुणभाऊ अग्रवाल, शहराध्यक्ष राजू डोफे, शहर कार्याध्यक्ष अमोल टप, नगरसेवक हबीब चौहान, ॲड. माजिद कुरेशी, रफीक भाई, जिल्हा उपाध्यक्ष बाळू पाटील, ओबीसी सेल जिल्हा उपाध्यक्ष श्रवण वाघ, जिल्हा उपाध्यक्ष शिवजी गोले, युवक शहराध्यक्ष इमरान शेख, शहर उपाध्यक्ष लखन कुरैशी, तसेच बासित खान, नरेंद्र सुरकर, वसीम खान, अरशद खान, बिलाल खान, रविंद्र गावडी, सुनील ठेकेदार, सलमान खान आणि पक्षाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी नव्याने पक्षात दाखल झालेल्या सर्व कार्यकर्त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद आणखी वाढविण्यासाठी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजितदादा गट) परिवारात नव्याने प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे हार्दिक स्वागत व त्यांच्या भावी राजकीय वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!


No comments