adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पेट्रोल ओतून दहशत माजवणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या

 पेट्रोल ओतून दहशत माजवणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या  सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अहिल्यानगर :-...

 पेट्रोल ओतून दहशत माजवणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर :- नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे रात्रीच्या अंधारात ज्वलनशील पदार्थ टाकून जाळपोळ करत प्रचंड दहशत निर्माण करणाऱ्या आणि गेल्या तीन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या दोन अट्टल आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अत्यंत शिताफीने बेड्या ठोकल्या आहेत. राकेश विशाल आल्हाट (वय २३) आणि मयूर उर्फ बाळू रवींद्र तेलधुणे (वय २१, दोघे रा. घोडेगाव) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळबळ उडाली आहे.मध्यरात्री सव्वा एकच्या सुमारास घोडेगाव येथील झापवाडी रोडवर आरोपींनी फिर्यादी सचिन साहेबा फुलमाळी यांच्या घरावर आणि कंपाऊंडवर पेट्रोल सारखा ज्वलनशील पदार्थ ओतून काडीपेटीने आग लावून दिली होती.या भयंकर जाळपोळीत फिर्यादीची मोटारसायकल आणि जनावरांचा चारा जळून खाक झाला होता. फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबावर दहशत बसवण्याच्या उद्देशानेच हा थरार घडवून आणण्यात आला होता. याप्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात 'भारतीय न्याय संहिता २०२३' च्या कलम ३२४(५), ३२४(६) आणि संघटित गुन्हेगारी संदर्भातील कडक कलम १११ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.​या गुन्ह्यातील बबलू जयसिंग लोंढे आणि विक्रम उर्फ बाबा सुधाकर आंग्रे यांना पोलिसांनी आधीच अटक केली होती. मात्र,उर्वरित आरोपी गेल्या तीन महिन्यांपासून फरार होते. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी एक विशेष पथक तयार केले.

​११ जुलै २०२६ रोजी पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून पक्का सुगावा लागला की, फरार आरोपी घोडेगाव येथील मिरीरोड चर्च परिसरात दबा धरून बसले आहेत.माहिती मिळताच पथकाने तातडीने तिथे जाऊन वेढा घातला. पोलिसांना पाहताच संशयास्पदरीत्या पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या राकेश आल्हाट आणि मयूर उर्फ बाळू तेलधुणे या दोघांना पोलिसांनी शिताफीने झडप घालून ताब्यात घेतले.पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.हि धडाकेबाज कारवाई

​पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोउपनि. संदीप दरवडे, पोलीस अंमलदार फुरकान शेख, सोमनाथ झांबरे, किशोर शिरसाठ, सागर ससाणे, मनोज साखरे, प्रशांत राठोड आणि चालक भगवान धुळे यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली. अटक केलेल्या आरोपींना पुढील तपासासाठी सोनई पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.

No comments