टाकळीभानमध्ये प्राईड अकॅडमीची भव्य आषाढी वृक्षदिंडी; भक्ती, संस्कार आणि पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संगम शौकतभाई शेख / श्रीरामपूर: (संपादक...
टाकळीभानमध्ये प्राईड अकॅडमीची भव्य आषाढी वृक्षदिंडी; भक्ती, संस्कार आणि पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संगम
शौकतभाई शेख / श्रीरामपूर:
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
माऊली प्रतिष्ठान संचलित प्राईड अकॅडमी ही पंचक्रोशीतील सर्वात उत्कृष्ट शैक्षणिक संस्था म्हणून आपला वेगळा नावलौकिक निर्माण करत आहे. संस्थेच्या विविध शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला सातत्याने चालना मिळत आहे. आषाढी एकादशीचे औचित्य साधून संस्थेच्या वतीने पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागातून तालुक्यातील प्रति पंढरपूर असलेले टाकळीभान विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे आषाढी एकादशीनिमित्त भव्य वृक्षदिंडी काढण्यात आली. भक्ती, संस्कार आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या दिंडीने संपूर्ण टाकळीभान गाव भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले. माऊली प्रतिष्ठानचे संस्थापक ज्ञानेश्वर माऊली मुरकुटे यांच्या प्रेरणेतून आणि प्राईड अकॅडमीच्या संस्थापिका डॉ. वंदनाताई मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम उत्साहात पार पडला.
गावातील विविध ठिकाणी ग्रामस्थांनी कमानी उभारून, पुष्पवृष्टी करून तसेच टाळ-मृदंगाच्या गजरात दिंडीचे जल्लोषात स्वागत केले. वारकरी, विठ्ठल-रुक्मिणी, तुळशी आणि पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या चिमुकल्यांनी संपूर्ण परिसर भक्तिरसात रंगविला. ज्ञानोबा-तुकाराम"च्या जयघोषात निघालेल्या दिंडीत वृक्षसंवर्धनाचा संदेश देत पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचविण्यात आले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेला संत गोरोबा काका यांच्यावरील नाट्यप्रयोग, विठ्ठलाचे मनोहारी दर्शन तसेच विठ्ठल भक्तीवरील आकर्षक नृत्य यांना पालक, ग्रामस्थ आणि उपस्थित मान्यवरांनी भरभरून दाद दिली.
यावेळी डॉ. वंदनाताई मुरकुटे यांनी विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती, वारकरी संप्रदाय, पर्यावरण संवर्धन आणि संस्कारमूल्यांचे महत्त्व पटवून दिले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, सांस्कृतिक वारशाबद्दल अभिमान, निसर्गप्रेम आणि राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ होते, असे त्यांनी सांगितले.
या अभिनव उपक्रमामुळे टाकळीभानमध्ये भक्ती, संस्कार आणि पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. पालक, ग्रामस्थ आणि उपस्थित मान्यवरांनी प्राईड अकॅडमीच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे मनापासून कौतुक करत संस्थेच्या सामाजिक बांधिलकी व गुणवत्तापूर्ण शिक्षण परंपरेचे विशेष अभिनंदन केले. दिंडीच्या समारोपप्रसंगी श्री साईबाबा मंदिर टाकळीभान येथे श्रीरामपूरचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष करण दादा ससाणे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
या दिंडी सोहळ्या प्रसंगी टाकळीभानच्या सरपंच अर्चनाताई रणनवरे, उपसरपंच कान्हा खंडागळे, अशोकचे कारेगाव भागचे संचालक शिवाजीराव शिंदे, माजी उपसरपंच राजेंद्र कोकणे, मार्केट कमिटीचे संचालक मयूर पटारे, अशोकचे संचालक यशवंतराव रणनवरे, सोसायटीचे चेअरमन राहुल पटारे, भाऊसाहेब मगर, भारत भवार, प्रा.कार्लस साठे सर, भाऊसाहेब पवार, विलास दाभाडे, दत्तात्रय नाईक,आबासाहेब आहेर, श्रीधर गाडे, ॲड धनराज कोकणे, दादासाहेब कापसे,अर्जुन राऊत, नयन गांधी,भैया पठाण, आबासाहेब रणनवरे, मुकुंद हापसे,भाऊसाहेब पटारे,भरत जाधव, आबासाहेब ढूस, सुनील बोडखे, महेंद्र संत, बाळासाहेब कोकणे, गजानन कोकणे,बापूसाहेब शिंदे, मेजर विनोद रणनवरे,जालिंदर पटारे, बंडोपंत कोकणे, अनिल बोडखे,संजय पटारे, रामकृष्ण गायकवाड, दिगंबर मगर, संतोष पटारे, अक्षय कोकणे, राहुल कोकणे, योगेश नवघणे,देवा पाबळे, बबलू वाघुले,विलास सपकळ, केतन शिंदे, वृषभ मगर, बाळासाहेब सपकळ, मोहन रणनवरे ,सुजित बोडखे, मधुकर गायकवाड,आप्पासाहेब रणनवरे, काकासाहेब डिके, बाळासाहेब खुरुद, शिवाजी पटारे, सतीश रणनवरे,आदीसह पालक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिंडी प्रसंगी मुलांना नाश्त्याची व्यवस्था कान्हा खंडागळे व पृथ्वीराज उंद्रे यांनी केल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राईड अकॅडमीप्री स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. वाडेकर, सौ. मिरीकर, प्राईड प्री-स्कूल भेर्डापुरच्या मुख्याध्यापिका प्रीती गोटे, प्राईड अकॅडमीच्या प्राचार्या अस्मिता देवरे, उपप्राचार्य प्रदीप गोराणे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. सर्वांचे आभार माऊली प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे यांनी मानले.
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111


No comments