adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

त्र्यंबकेश्वर पंचायत समितीच्या दिशादर्शक फलकाची नागरिकांची मागणी

 त्र्यंबकेश्वर पंचायत समितीच्या दिशादर्शक फलकाची नागरिकांची मागणी     प्रतिनिधी जयवंत हागोटे त्रंबकेश्वर  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) त्र्य...

 त्र्यंबकेश्वर पंचायत समितीच्या दिशादर्शक फलकाची नागरिकांची मागणी 


   प्रतिनिधी जयवंत हागोटे त्रंबकेश्वर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

त्र्यंबकेश्वर, प्रतिनिधी : त्र्यंबकेश्वर पंचायत समितीचे कार्यालय अंजनेरी येथील ब्रह्मयाली कॉलेजच्या परिसरात स्थलांतरित करण्यात आले आहे. मात्र, त्र्यंबक–नाशिक मुख्य रस्त्यावर पंचायत समितीकडे जाणाऱ्या मार्गावर कोणताही दिशादर्शक फलक (बोर्ड) अथवा एरो लावण्यात आलेला नसल्याने ग्रामीण भागातून तसेच बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. कार्यालयाचे नवीन ठिकाण माहिती नसल्यामुळे अनेक नागरिकांना पंचायत समितीचे कार्यालय शोधण्यासाठी वेळ वाया घालवावा लागत आहे. परिणामी, शासकीय कामकाजासाठी आलेल्या नागरिकांना अनावश्यक त्रास सहन करावा लागत असून वेळेत कामे पूर्ण करण्यातही अडचणी निर्माण होत आहेत. नागरिकांनी संबंधित प्रशासनाकडे त्र्यंबक–नाशिक मुख्य रस्त्यावर पंचायत समितीकडे जाणाऱ्या फाट्यावर ठळक व स्पष्ट दिशादर्शक फलक लावण्याची मागणी केली आहे. यामुळे नवीन येणाऱ्या नागरिकांना कार्यालय सहज सापडेल, वेळेची बचत होईल आणि शासकीय सेवांचा लाभ अधिक सुलभपणे घेता येईल. स्थानिक नागरिकांच्या या रास्त मागणीकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन आवश्यक दिशादर्शक फलक बसवावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 


No comments