गावाच्या विकासासाठी गट तट विसरुन सर्वानी एकत्र येणे गरजेचे आहे - आमदार नंदकिशोर महाजन मोठा वाघोदा वासियांनी केला भव्य सत्कार! रावेर प्रत...
गावाच्या विकासासाठी गट तट विसरुन सर्वानी एकत्र येणे गरजेचे आहे - आमदार नंदकिशोर महाजन
मोठा वाघोदा वासियांनी केला भव्य सत्कार!
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
गावाच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी गावातील नागरिकांनी तसेच सर्व पक्षांच्या लोकप्रतिनिधी पदाधिकारी यांनी एकत्रितपणे संयुक्त विचारविनिमय करून प्रयत्न केला तर गावाचा विकास करणे सहज शक्य असल्याचे प्रतिपादन विधानपरिषद चे नवनिर्वाचित आमदार नंदकिशोर भागवत महाजन यांनी मोठा वाघोदा ग्रामस्थांनी सार्वत्रिक भव्य सत्कार समारंभात ते म्हणाले मी एक सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातील व्यक्ती आज पक्षाशी एकनिष्ठ राहिल्यामुळे व पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या जबाबदाऱ्या चोख पणे पाडल्यामुळेज मला आज आमदार होण्याचा बहुमान मिळाला असल्याचे ही ते म्हणाले आणि आपण व्यक्त केलेले प्रेम, स्नेह,विश्वास आणि दिलेला मान हा माझ्यासाठी अधिक जबाबदारीची जाणीव करून देणारा आहे.या आत्मीय सत्काराबद्दल पाटील परिवार व सर्व ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभार त्यांनी यावेळी मानले.आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि आशीर्वादाने जनतेच्या विकासासाठी व सेवेसाठी सदैव कटिबद्ध राहणार असल्याची ग्वाही दिली. यावेळी व्यासपीठावर आमदार नंदकिशोर महाजन, प्रगतशील शेतकरी डी के महाजन,पी.टी.महाजन सर,श्रावण सिताराम महाजन डॉ रमेश बाबुराव पाटील, भागवत भंगाळे जगन्नाथ पाटील सर, किशोर भाऊ पाटील राजू बुवा महानुभाव, लोकनियुक्त सरपंच अलकाबाई बाळू महाजन उपस्थित होते
मोठा वाघोदा वासियांनी विधान परिषदेचे आमदार नंदकिशोर महाजन हे गावाचे भाचे तसेच जावई असल्याने मोठा वाघोदा बुद्रुक येथील सर्वधर्मीय समाज बांधवांच्या वतीने भव्य सत्कार केला यामध्ये स्वर्गीय सुभाष बाबुराव पाटील परिवाराच्या वतीने डॉ रमेश बाबुराव पाटील, राहुल सुभाष पाटील किरण रमेश पाटील डॉ अमोल रमेश पाटील, वृंदावन मॉल चे संचालक विशाल भाऊ पाटील वैभव बाळू चौधरी विनोद पाटील सर सुरेश पाटील सदानंद पाटील डॉ प्रमोद पाटील कुलदीप पाटील अरुण कुमार पंजाबी यांनी तर चक्रधर शिक्षण मंडळ च्या वतीने डी.के.महाजन श्रावण महाजन, मुख्याध्यापक व्ही एस महाजन शिक्षकेतर कर्मचारी.गोपाळकृष्ण वाचनालय,पीक संरक्षण सोसायटी दुध उत्पादक संस्था महानुभाव पंथ,विकासो, ग्रामपंचायत, गुर्जर तडवी पंच मुस्लिम , बुध्द समाज, बांधवांनी भाजपा शिवसेना पदाधिकारी पत्रकार संघाचे मिलींद कोरे मुबारक उर्फ राजू तडवी स्वप्निल पवार योगेश पाटील कमलाकर माळी मलिक शाकिर आदिसह गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित मान्यवरांनी नवनियुक्त आमदार नंदकिशोर महाजन याचा सत्कार केला कार्यक्रमाचे आयोजन राहुल सुभाष पाटील किरण रमेश पाटील यांच्या पाटील परिवाराच्या वतीने करण्यात आले होते यावेळी मोठा वाघोदा वासिय बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पवन सर यांनी केले


No comments