adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सार्वजनिक विद्यालय अडावद येथे "कळी उमलतांना" कार्यक्रम संपन्न.

  सार्वजनिक विद्यालय अडावद येथे "कळी उमलतांना" कार्यक्रम संपन्न.  अडावद प्रतिनिधी  (संपादक -:- हेमकांत गायकवाड)  अडावद : ता चोपडा ...

 सार्वजनिक विद्यालय अडावद येथे "कळी उमलतांना" कार्यक्रम संपन्न. 


अडावद प्रतिनिधी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 अडावद : ता चोपडा येथील  सार्वजनिक विद्यालय अडावद येथे कळी उमलतांना या विषयावर मुख्याध्यापक  अशोक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली किशोरवयीन मुलींसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून चोपडा येथील सुप्रसिद्ध वैद्य प्राजक्ता महाले या  उपस्थित होत्या सर्वप्रथम मार्गदर्शक पाहुण्यांचे स्वागत व सत्कार विद्यालयातील ज्येष्ठ उपशिक्षिका श्रीमती शुभांगी देशमुख  यांनी केला. यानंतर डॉक्टर सौ प्राजक्ता महाले  यांनी शाळेतील उपस्थित किशोरवयीन मुलींना वयाच्या या टप्प्यात होणारे शारीरिक व मानसिक बदल,ताणतणाव व्यवस्थापन, आत्मविश्वास वाढविणे, भावनिक व माणसिक आरोग्य, स्वच्छता, आहार,पालकांशी संवाद,सामाजिक जाणीवा,पालकांची भूमिका या मुद्द्यांवर सखोल मार्गदर्शन केले. 


कार्यक्रमाच्या अध्यक्षा माता पालक सौ मानसी मनोहर पाटील या होत्या. यावेळी महिला उपशिक्षिका श्रीमती सपना कोळी श्रीमती ज्योती पाटील, श्रीमती सारिका चरडे  व बहुसंख्य माता पालक व विद्यार्थिनी उपस्थित होत्या. उपस्थित माता पालकांनी या कार्यक्रमामुळे विद्यार्थिनींच्या ज्ञानात भर, मनातील भीती व याबाबत पालकांची भूमिका व सामाजिक जाणीवा काय असतात हे कळले. अशा भावना व्यक्त करून शाळेला धन्यवाद दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  सचिन पाटील  यांनी तर आभार प्रदर्शन सौ नलिनी  पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षीका यांनी सहकार्य केले

No comments