फैजपूरात दोस्ताना फाउंडेशनतर्फे महाराष्ट्र पोलीस दलात निवड झालेल्या तरुणांचा गौरव फैजपूर इदू पिंजारी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) फैजप...
फैजपूरात दोस्ताना फाउंडेशनतर्फे महाराष्ट्र पोलीस दलात निवड झालेल्या तरुणांचा गौरव
फैजपूर इदू पिंजारी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर येथील नायरा पेट्रोल पंपाचे संचालक, दोस्ताना फाउंडेशन ग्रुपचे अध्यक्ष तथा फैजपूर शहराचे लोकप्रिय नगरसेवक कुर्बान शेख यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र पोलीस दलात निवड झालेल्या तरुणांचा गौरव सोहळा रविवारी (दि. १२ जुलै २०२६) नायरा पेट्रोल पंप परिसरात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
यावेळी जळगाव जिल्हा पोलीस दलात निवड झालेले साहिल शेख (स्व. पोलीस उपनिरीक्षक शकील शेख यांचे चिरंजीव, सध्या जालना येथील पीटीसीमध्ये प्रशिक्षणार्थी), अजहर शेख बाबू (फैजपूर) तसेच तौसीफखान आरिफखान, ज्यांची मुंबई पोलीस दलात निवड झाली आहे, यांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास नगरसेवक कुर्बान शेख, शेख अब्दुल रसूल, शेख शब्बीर कबीर, फिरोज खान, अफजल खान, आरिफ खान, शेख फारुखभाई, अख्तर पहलवान, हाजी खलील साहेब, फिरोजभाई, शेख वासिमभाई, मुज्जेमिल रहेमान, जफर अली सय्यद यांच्यासह रावेर व फैजपूर परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी कुर्बान शेख यांचे ज्येष्ठ बंधू शेख साबिर शेख करीम यांनी प्रेरणादायी मनोगत व्यक्त करत सत्कारमूर्ती तरुणांचे विशेष कौतुक केले. त्यांनी प्रशिक्षण काळासाठी तसेच पुढील पोलीस सेवेत उज्ज्वल व यशस्वी कारकिर्दीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रम उत्साहपूर्ण व आनंददायी वातावरणात संपन्न झाला. उपस्थितांनी पोलीस दलात निवड झालेल्या युवकांचे अभिनंदन करत त्यांच्या यशाचा अभिमान व्यक्त केला.

No comments